शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

परभणी : आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:28 AM

राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार येथून धनगर समाज बांधवांच्या या मोर्चाला प्रारंभ झाला. मोठा मारुती, जिल्हा स्टेडियममार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी पद्मश्री खा.विकास महात्मे, बबन मुळे, सुरेश भुमरे, अनंत बनसोडे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. धनगर समाजाचा आरक्षण लढा एकजुटीने लढल्यानेच आतापर्यंत शासनाकडून विविध सवलती समाजाला मिळाल्या. १ हजार कोटी रुपयांच्या सवलती या आंदोलनाच्या दबावामुळेच समाजाला मिळू शकल्या, असे सांगून एस.टी.चे प्रमाणपत्र मिळेपर्यंत आरक्षणाचा लढा सुरुच ठेवणार असल्याचे खा. महात्मे यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात बबनअण्णा मुळे, सुरेश भुमरे, अनंत बनसोडे, मारोतराव पिसाळ, कठाळूमामा शेळके, सखाराम बोबडे, नारायण घनवटे, दीपक शेंद्रे, गंगाधर खेडूळकर, गंगाधर पितळे, अप्पा बनसोडे, नामदेव आव्हाड, अशोक मुळे, सुरेश चांदणे, पिराजी भुमरे, राम ढेंबरे, विष्णू बोरचाटे, संगीता जगाडे, गंगासागर वाळवंटे, विष्णू कोरडे, गणेश मुळे, सचिन गारुडी, लक्ष्मण बोबडे, गोविंद पारटकर, अनिल ताल्डे, बाळू बोबडे, वैजनाथ भंडारे, नामदेव निळे, गोपाळ मात्रे, सरपंच सीमा घनवटे, प्रभाकर जगाडे, राजेश बालटकर, नरसिंग ढेंबरे, लक्ष्मण वैद्य आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीDhangar Reservationधनगर आरक्षणagitationआंदोलन