परभणी : बॅलेट पेपरसाठी ‘वंचित’चा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:11 IST2019-07-23T00:10:15+5:302019-07-23T00:11:18+5:30
विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासह विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी तहसीलवर मोर्चा काढला.

परभणी : बॅलेट पेपरसाठी ‘वंचित’चा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासह विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी तहसीलवर मोर्चा काढला.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरूवात झाली़ तेलभरे चौक, शिवाजी चौक मार्गाने हा मोर्चा तहसीलवर पोहोचला. तहसीलदार डॉ.आशीषकुमार बिरादार यांना दिलेल्या निवेदनात आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसह मॉब लिंचिंग प्रकरणी कडक कायदा करावा, सोनपेठ तालुक्यातील गायरान जमिनीचे तात्काळ पंचनामे करुन जमिनी नावे कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर दादाराव पंडित, भैय्या भालेराव, आशाताई खिल्लारे, दिलीप मोरे, प्रकाश उजागरे, दिलीप सौंदरमल, सुशील सोनवणे, ज्ञानेश्वर मोरे आदींची नावे आहेत.