परभणी : नळ जोडणीची अनामत रक्कम दोन हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:16 AM2020-01-22T00:16:42+5:302020-01-22T00:17:49+5:30

नवीन पाणीपुरवठा योजनेची नळ जोडणी नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या दरातून २ हजार रुपयांची अनामत रक्कम कमी करण्याचा आणि एजन्सीऐवजी मनपाने स्वत: मीटर खरेदी करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र नळजोडणीच्या दरनिश्चिती बाबत ठोस निर्णय न घेताच सभा आटोपती घेण्यात आली.

Parbhani: Deposit amount of tap connection up to two thousand | परभणी : नळ जोडणीची अनामत रक्कम दोन हजारांवर

परभणी : नळ जोडणीची अनामत रक्कम दोन हजारांवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेची नळ जोडणी नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या दरातून २ हजार रुपयांची अनामत रक्कम कमी करण्याचा आणि एजन्सीऐवजी मनपाने स्वत: मीटर खरेदी करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र नळजोडणीच्या दरनिश्चिती बाबत ठोस निर्णय न घेताच सभा आटोपती घेण्यात आली.
परभणी शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची नळ जोडणी देण्यासाठी दर निश्चित करण्याच्या उद्देशाने २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बी.रघुनाथ सभागृहात महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त रमेश कदम, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची मंचावर उपस्थिती होती. सुरुवातीला मनपा प्रशासनाच्या वतीने आयुक्त रमेश पवार यांनी या योजनेची संपूर्ण माहिती दिली. तसेच एजन्सीच्या माध्यमातून नळजोडणी देण्याचे प्रशासनाने ठरविल्याचे सांगितले. त्यात खोदकाम, नळजोडणीसाठी लागणारे आयएसआय मार्कचे पाईप, पाणी मोजणीचे मीटर बसविण्याचे काम एजन्सी करणार असून, त्यासाठी १० हजार रुपयांचा दर आकारण्यात आला आहे. शिवाय महानगरपालिका ४ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून स्वीकारणार आहे. अशा पद्धतीने १४ हजार रुपयांना नळ जोडणी करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला. नळजोडणीची संपूर्ण जबाबदारी एजन्सीवर देण्यात आली असून, अवैध नळजोडणी आढळल्यासही एजन्सीला जबाबदार धरले जाणार आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडूनही नळ जोडणीचे प्रस्ताव मागविले होते. त्यांनी रस्ता ओलांडून नळ जोडणीसाठी १३ हजार ५८६ आणि रस्ता न ओलांडता जोडणी करण्यासाठी ९ हजार ९४० रुपये एवढा खर्च लागेल, असे कळविले होते. त्यातुलनेत एजन्सीने १० हजार रुपयांचा दर दिला असून तो मान्यतेसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.
या प्रस्तावाला सर्वच नगरसेवकांनी विरोध केला. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे हे दर नसून ते कमी करावेत, अशी मागणी सभापती सचिन देशमुख, नगरसेवक सचिन अंबिलवादे, मोकिंद खिल्लारे, नाजनीन पठाण, विकास लंगोटे, बालासाहेब बुलबुले, नागेश सोनपसारे, अतूल सरोदे, इम्रान लाला आदींसह सर्वच नगरसेवकांनी केली. या प्रश्नावर चर्चा करताना पाणीपुरवठा सभापती सचिन देशमुख यांनी सुरुवातीलाच जोरदार आक्षेप नोंदविला. परभणी शहरात ७१ स्लम एरिया आहेत. त्यामुळे सर्वांना सारखा दर लावणे उचित नाही. अधिक अंतर असेल तर जोडणीचा खर्च वाढणार आहे तर कमी अंतर असणाऱ्या नागरिकांना हा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे अंतराप्रमाणे दर आकारावेत. तसेच सध्याचा निश्चित केलेला दर योग्य नाही. तसेच हे दर कमी करण्यासाठी अर्जासाठी लागणारा खर्च कमी करावा बॉण्ड, शपथपत्र यासाठीचा खर्च कमी केला तर ७०० ते ८०० रुपये कमी होऊ शकतात. तसेच दुरुस्तीचा जो खर्च घेतला जाणार आहे, तो खर्च कमी करावा आणि अनामत रक्कम ४ हजार ऐवजी २ हजार रुपये करण्याची मागणी केली. नगरसेवक सचिन अंबिलवादे यांनीही अंतरानुसार दर लावण्याची मागणी केली. तसेच एजन्सी जे मीटर देणार आहे, हे मीटर मनपाने खरेदी केले तर दर कमी होऊ शकतात. त्यामुळे एजन्सीऐवजी मनपाने मीटर खरेदी करावेत, अशी मागणी केली. स्लम एरियासाठी नळजोडणीचे दर वेगळे ठेवावेत व सर्वसाधारण दरांपेक्षा ते कमी असावेत, अशी सूचना नगरसेवक नागेश सोनपसारे यांनी मांडली. या सर्व चर्चेनंतर उपमहापौर भगवान वाघमारे म्हणाले, मोठ्या मेहनतीने ही योजना आता पूर्णत्वाला गेली आहे. नागरिकांना नियमित पाणी मिळावे तसेच पैशांअभावी योजना बंद पडू नये, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
माहिती नसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
४सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर अधिकाºयांना समाधानकारक माहिती देता आली नाही़ सभेचा विषय ठरलेला असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी जर अभ्यास करून अथवा अर्धवट माहितीच्या आधारावर सभागृहात उपस्थित राहत असतील तर अशा अधिकाºयांवर कारवाई केली जाईल़
४परिपूर्ण माहिती उपलब्ध नसणाºया अधिकाºयांना सभागृहात बसू दिले जाणार नाही, असा इशारा उपमहापौर भगवान वाघमारे यांनी दिला़ सोमवारच्या सभेत नळ जोडण्यांची संख्या, अनाधिकृत जोडण्या यांची माहिती व्यवस्थित न मिळाल्याने हा मुद्दा उपस्थित झाला़
योजना चालविण्यास लागणारा खर्च
वर्षाकाठी १५ कोटी रुपये त्यात कर्मचाºयांवरील खर्च ७० लाख रुपये, वीज पुरवठ्यावरील खर्च १३़५० कोटी रुपये, ब्लिचिंग पावडर १५ लाख रुपये़
विस्कळीत पुरवठ्यामुळे संतापले नगरसेवक
४दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नगरसेवकांनी सभागृहात संताप व्यक्त केला. एकाच वेळी तीन मोटार बंद पडल्याने हा पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांचा निष्काळजीपणा असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहासमोर करण्यात आली.
४दोन विद्युत पंप स्टँड बाय ठेवले जात असताना तीन पंप बंद पडेपर्यंत अधिकारी लक्ष देत नसल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी.
४पाणी उपलब्ध असतानाही केवळ निष्काळजीपणामुळे जर नागरिकांना १८-१८ दिवस पाणी मिळत नसेल तर ही बाब गंभीर आहे. यापुढे असा प्रकार झाला तर कारवाई करण्याच्या सूचना उपमहापौर भगवान वाघमारे यांनी दिल्या.
योजना चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याला मनपाला १ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कुठूनही पैसे न मागविता किंवा कर्ज न घेता योजना चालविता आली पाहिजे, या उद्देशाने सांगड घालावी लागणार आहे. तेव्हा नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनेप्रमाणे अनामत रक्कम ४ हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये स्वीकारण्याचा निर्णय सभागृहाने मान्य केला. त्याचप्रमाणे नळजोडणीसाठी लागणारे मीटर एजन्सी ऐवजी महापालिका खरेदी करेल, असा निर्णय या सभेत घेण्यात आला. जोडणीसाठी येणारा खर्च कसा कमी करता येईल, आणखी काही पर्याय आहेत का? याविषयी आगामी बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्याचे यावेळी ठरले.

Web Title: Parbhani: Deposit amount of tap connection up to two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.