शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

परभणी : खराब बस लाईनवर पाठविल्याने आगारप्रमुखाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:51 PM

खराब एसटी बस लाईनवर पाठविल्याने परभणी आगाराच्या आगारप्रमुखांवर औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थापकांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: खराब एसटी बस लाईनवर पाठविल्याने परभणी आगाराच्या आगारप्रमुखांवर औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थापकांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे.परभणी आगारातून परभणी- कुंभारी या एम.एच.०७-बीएल ७२२१ क्रमांकाच्या बसचा समोरील भाग नादुरुस्त अवस्थेत असतानाही प्रवाशांची ने-आण करण्यात आली. त्यानंतर ही बस परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथील बसस्थानकावर पोहचली.या ठिकाणी बसने ये-जा करणाऱ्या काही युवकांनी ‘परभणी- कुंभारी शिवशाही’ अशी टॅग लाईन देत सोशल मीडियावर नादुरुस्त बसची छायाचित्रे पोस्ट करुन परभणी आगाराने वाभाडे काढले. ही पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर एस.टी.महामंडळाच्या मुंबई व औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी या छायाचित्रांची दखल घेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश परभणी विभागातील यंत्र अभियंता एम.आर. नगराळे यांना दिले. त्यांनी गाडीच्या दुरुवस्थेची पाहणी करुन आपला अहवाल मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाला सादर केला. या अहवालात आगारप्रमुख दयानंद पाटील या गाडीच्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानंतर औरंगाबाद येथील एस.टी. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक पंचभाई यांनी आगारप्रमुख दयानंद पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.याबाबत यंत्र अभियंता एम.आर.नगराळे यांना विचारणा केली असता प्रवासी सुरक्षीतता आमच्यासाठी महत्वाची आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या आदेशावरुन आगारप्रमुख दयानंद पाटील यांचे निलंबन झाल्याचे ते म्हणाले.फेसबुकवरची पोस्ट निलंबनाचे कारण४परभणी आगारातून दरदिवशी अनेक फेºया बस दुरुस्तीअभावी रद्द करण्याच्या घटना वेळा घडल्या आहेत; परंतु, वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत कधीच पाऊले उचलली नाहीत; परंतु, परभणी- कुंभारी या बसचा शो पूर्णपणे कोलमडला असताना ती बस दुरुस्त करण्याऐवजी लाईनवर पाठविण्यात आली. त्यानंतर काही युवकांनी त्या बसचे फोटो ‘परभणी- कुंभारी शिवशाही बस’ या टॅगलाईनने पोस्ट करीत एस.टी.महामंडळाचे वाभाडे काढले. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कार्यालयाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFacebookफेसबुकstate transportएसटी