परभणी : पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:44 IST2019-11-14T23:43:18+5:302019-11-14T23:44:00+5:30
येथील धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली़

परभणी : पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): येथील धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली़
जिंतूर येथील नितीन चंद्रकांत बानाटे (२५) हा तरुण त्याचा मित्र सुरज शिवकुमार वाव्हळ (१६) याच्यासह येलदरी येथे पोहण्यासाठी गुरुवारी आला होता़ दुपारी ३ च्या सुमारास धरणाच्या मातीच्या भिंतीजवळ दगडी पिचिंगवरुन नितीन पाण्यात उतरला़
धरण भरल्याने त्यामधील पाण्याचा नितीनला अंदाज आला नाही़ त्यामुळे तो पाण्यात बुडाला़ ही माहिती त्याचा मित्र सुरज वाव्हळ याने आजुबाजूच्या ग्रामस्थांना दिली़ त्यानंतर ही माहिती नितीनच्या वडिलांना देण्यात आली़ नितीनचे वडील पोलीस विभागात नोकरीस असून, ते तातडीने पोेलिसांसह घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर पाण्यात बुडालेल्या नितीनला बाहेर काढण्यासाठी येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या तरुणांनी पाण्यात उडी घेतली़ त्यानंतर नितीनचा शोध घेवून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले़ यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले़ मयत नितीन बानाटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला़