परभणी जिल्ह्यात २१३ पाणी नमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 07:13 PM2018-07-09T19:13:05+5:302018-07-09T19:14:03+5:30

जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील १०३० पाणी नमुन्यांची जून महिन्यात तपासणी करण्यात आली होती.

Parbhani damaged 213 water samples found in the district | परभणी जिल्ह्यात २१३ पाणी नमुने आढळले दूषित

परभणी जिल्ह्यात २१३ पाणी नमुने आढळले दूषित

Next

परभणी:  येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील १०३० पाणी नमुन्यांची जून महिन्यात तपासणी करण्यात आली होती. यातील २१३ पाणी नमुने दूषित आढळले असून यामध्ये वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक १७ नमुने दूषित आढळले आहेत. 

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गाव स्तरावरील पाणी स्त्रोतांचे नमुने घेऊन जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, लघु प्रयोगशाळेमध्ये या नमुन्याची तपासणी केली जाते. जून महिन्यातही प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पाणी स्त्रोतांचे नमुने मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण १०३० नमुने प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले होते. या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील तब्बल २१३ नमुने दूषित आढळले आहेत.

परभणी तालुक्यातील दैठणा, जांब, पेडगाव, पिंगळी, झरी या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१५ पाणीस्त्रोतांचे  नमुने घेण्यात आले होते. यातील ४६ नमुने दूषित आढळले आहेत. परभणी तालुक्यातील पेडगाव व झरी या दोन आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी ११ नमुने दूषित आढळले आहेत. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, कंठेश्वर, कावलगाव, ताडकळस या आरोग्य केंद्रांतर्गत पाणीस्त्रोतांच्या १५१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ११  नमुने दूषित आढळले.

गंगाखेड तालुक्यातील धारासूर, कोद्री, महातपुरी, पिंपळदरी, राणीसावरगाव आरोग्य केंद्रांतर्गत ११४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ४० नमुने दूषित आढळले. सोनपेठ तालुक्यातील ५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ७ नमुुने दूषित आढळले आहेत. पालम तालुक्यातील चाटोरी व रावराजूर या दोन आरोग्य केंद्रांतर्गत ७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

सेलू तालुक्यातील देऊळगाव गात व वालूर आरोग्य केंद्रांतर्गत ७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील २६ नमुने दूषित आढळले आहेत. मानवत तालुक्यातील कोल्हा व रामपुरी आरोग्य केंद्रांतर्गत ९३ नमुन्यांपैकी १७ नमुने दूषित आढळले आहेत. जिंतूर तालुक्यातील आसेगाव, आडगाव, चारठाणा, कौसडी, वझर, येलदरी अंतर्गत १८५ नमुन्यांपैकी ३६ नमुने दूषित आढळले तर पाथरी तालुक्यातील बाभुळगाव, हादगाव, पाथरगव्हाण, वाघाळा आरोग्य केंद्रांतर्र्गत ६४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. 

पाथरगव्हाण येथे एकही नमुना दूषित नाही
पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील १८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही पाणी नमुना दूषित आढळला नाही. तर सेलू तालुक्यातील वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४९ पाणी नमुन्याची तपासणी करण्यात आली. यातील १७ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित आढळलेल्या पाणीस्त्रोताचे पाणी पिण्यासाठी वापरु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Web Title: Parbhani damaged 213 water samples found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.