परभणी : खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:38 IST2018-12-03T00:38:38+5:302018-12-03T00:38:57+5:30
दुकान चालवायचे असेल तर पैशांची मागणी करीत बळजबरीने खिशातील पैसे काढून घेतल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक केली आहे.

परभणी : खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): दुकान चालवायचे असेल तर पैशांची मागणी करीत बळजबरीने खिशातील पैसे काढून घेतल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक केली आहे.
शहरातील महात्मा फुलेनगर पाटी जवळ इस्त्रीचे दुकान चालविणाऱ्या मनोहर छगन कोकरे हे २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानात असताना किशोर ऊर्फ पिंटू विष्णूकांत घोबाळे हा दुकानात आला. तुला या ठिकाणी दुकान चालवायचे असेल तर १ हजार रुपये दे, अशी पैशांची मागणी त्याने केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दुकान चालवू देणार नाही, अशी धमकी देऊन मारहाण केली. याचेवळी खिशातील ६०० रुपये बळजबरीने काढून घेतले आणि दुकान चालवायचे असेल तर तुला हप्ता द्यावाच लागेल, असे सांगून किशोर घोबाळे निघून गेल्याची तक्रार मनोहर कोकरे यांनी दिली. या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खंडणी मागून पैसे काढून घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोईनोद्दीन पठाण, पोलीस नायक सुग्रीव कांदे, जिलानी शेख यांनी काही वेळातच आरोपी किशोर ऊर्फ पिंटू घोबाळे यास ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास जमादार वसंतराव निळे, मुक्तार पठाण हे करीत आहेत.