- राजन मंगरूळकर
परभणी : दरोडा प्रकरणातील फरार आरोपी पकडण्यासाठी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक सोमवारी रात्री जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरात पिंपरी येथे गेले होते. त्यावेळी आरोपीला पकडले असता संबंधिताने पोलीस हवालदार निलेश भुजबळ यांच्या पाठीवर चाकूने हल्ला केला. या घटनेत पोलीस हवालदार निलेश भुजबळ हे जखमी असून त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाथरी तालुक्यातील एका दरोडेच्या प्रकरणात फरार असलेल्या दीपक भोसले या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी नेमले होते. या पथकात अधिकारी कर्मचारी अंमलदार यांचा समावेश होता. सदरील पथकाला दीपक भोसले व साथीदार हे चारठाणा शिवारातील पिंपरी येथे पाल टाकून वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. यावरून सोमवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान हे पथक तेथे पोहोचले असता आरोपीला पकडताना पोलीस हवालदार निलेश भुजबळ यांच्या पाठीवर संबंधिताने हल्ला केला. निलेश भुजबळ जखमी झाले त्यांना चारठाणा त्यानंतर जिंतूर आणि तेथून परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेतील अंमलदार त्यांनी भेट देऊन भुजबळ यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान संबंधित चाकू हल्ला केलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. याप्रकरणी रात्री कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
Web Summary : A fugitive robbery suspect in Parbhani stabbed a police officer during an arrest attempt in Jintur. Detective Nilesh Bhujbal sustained injuries and is hospitalized. Police have apprehended the suspect. Senior officers visited Bhujbal.
Web Summary : परभणी में एक फरार डकैती के आरोपी ने जिंतूर में गिरफ्तारी के प्रयास के दौरान एक पुलिस अधिकारी पर चाकू से हमला किया। जासूस निलेश भुजबल घायल हो गए हैं और अस्पताल में हैं। पुलिस ने संदिग्ध को पकड़ लिया है। वरिष्ठ अधिकारियों ने भुजबल से मुलाकात की।