परभणी : सरपंच, ग्रामसेवकाला न्यायालयाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:35 IST2018-10-21T00:34:27+5:302018-10-21T00:35:10+5:30
शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बलसा ग्रा.पं.ने पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने न्यायालयाने लेखी म्हणणे मांडण्यासाठी बलसा ग्रामपंचातीचे सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस पाठविली आहे, अशी माहिती दिलावरसिंग जुन्नी यांनी दिली.

परभणी : सरपंच, ग्रामसेवकाला न्यायालयाची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बलसा ग्रा.पं.ने पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने न्यायालयाने लेखी म्हणणे मांडण्यासाठी बलसा ग्रामपंचातीचे सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस पाठविली आहे, अशी माहिती दिलावरसिंग जुन्नी यांनी दिली.
जुन्नी यांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील शाहूनगर भागात १५ ते २० वर्षांपासून ५३ कुटुंब वास्तव्याला आहेत. या कुटुंबियांना बलसा येथील सरपंच व ग्रामसेवकाने अतिक्रमण काढण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ५३ कुटुंबियांच्या वतीने अॅड.एन.व्ही. पिंपळगावकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. सुनावणीच्या वेळी मनपाच्या कर भरल्याच्या पावत्या, स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश, अनुदानाची कागदपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्र सादर करण्यात आली व ग्रामपंचायतने पाठविलेली नोटीस नियमबाह्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने २४ आॅक्टोबरपर्यंत सरपंच व ग्रमसेवकांना लेखी म्हणणे मांडावे, अशी नोटीस बजावली असल्याची माहिती जुन्नी यांनी दिली.