परभणी : कार-दुचाकीची टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:22 IST2019-03-10T00:21:57+5:302019-03-10T00:22:31+5:30

कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली.

Parbhani: A car-bicycle collision | परभणी : कार-दुचाकीची टक्कर

परभणी : कार-दुचाकीची टक्कर

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली.
लासिना येथील बालासाहेब खोसे व सय्यद शेख हे दोघे एम.एच.२१ ई ६९११ या दुचाकीवरुन पाथरी येथून गावाकडे जात होते. राष्टÑीय महामार्गावरील पोखर्णी फाट्यावर त्यांची गाडी रस्ता ओलांडत असताना मानवतकडून पाथरीकडे येणाऱ्या एम.एच.२२/ए.एम. ४४८८ या कारची आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात बालासाहेब खोसे व सय्यद शेख हे जखमी झाले. दोघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बालासाहेब खोसे यांच्या डोळ्याला इजा झाल्याने तेथून त्यांना परभणी येथे हलविण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.
हायमास्ट बंद असल्याने वाढले अपघात
पाथरी शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गावर पोखर्णी फाटा ते आष्टी फाट्यापर्यंत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र अद्याप हे दिवे सुरू केले नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडत असताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारीही त्यातूनच हा अपघात झाला.

Web Title: Parbhani: A car-bicycle collision