परभणी :एकाच एटीमवर तालुक्याचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:02 IST2019-03-07T00:01:25+5:302019-03-07T00:02:20+5:30
शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे इंडिया बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर इंडिया बंँकेचे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे एकाच एटीएमवर तालुक्यासह शहरातील नागरिकांचा भार येत आहे. परिणामी, ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

परभणी :एकाच एटीमवर तालुक्याचा भार
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे इंडिया बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर इंडिया बंँकेचे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे एकाच एटीएमवर तालुक्यासह शहरातील नागरिकांचा भार येत आहे. परिणामी, ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सोनपेठ तालुक्याची निर्मिती झाल्यापासून या तालुक्यातील नागरिकांची परवड अद्यापही थांबली नसल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांना कधी रस्त्यासाठी तर कधी आरोग्य, शिक्षणाच्या मुलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागते. रस्त्यासाठी तर सोनपेठकरांनी गेल्या दोन वर्षापासून आपला लढा सुरू ठेवला आहे; परंतु, त्यांच्या या लढ्याला यश आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच सोनपेठ शहरात एकमेव असलेल्या राष्टÑीयकृत बँकेत शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांसह ५० हजारांच्यावर खातेदार आहेत. त्यामुळे या बँक शाखेत दररोज लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहार होत असतात. पूर्वी सोनपेठ येथे दोन एटीएम होते; परंतु, बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर एक एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना एकाच एटीएमवर अवलंबून राहावे लागत आहे.
कार्यरत एमटीएम कधी बंद तर कधी सुरू असते. त्यामुळे ग्राहकांना अनेक वेळा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा आग्रणी बँक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सोनपेठ शहरात दोन ते तीन नवीन एटीएम सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
एटीएम केंद्राची दुरवस्था
सोनपेठ शहरातील एकमेव असलेल्या एटीएमचीही मोठी दुरवस्था झाली आहे. या एटीएमचा एक दरवाजा तुटलेला आहे. सुरक्षारक्षकही नसल्याने सध्या तरी या एटीएमची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरात वैद्यनाथ बँकेचे एटीएम आहे. हे एमटीएम केवळ कार्यालयीन वेळेतच चालू राहते. त्यामुळे या एटीएमचा नागरिकांना फारसा उपयोग फारसा उपयोग होत नाही.