Parbhani: Bright light of 3,000 lamps | परभणी : ५१ हजार दिव्यांनी उजळला परिसर
परभणी : ५१ हजार दिव्यांनी उजळला परिसर

लोकमत न्यूज नेटवर्क
पोखर्णी नृ़ (परभणी ) : परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्ज्वलित केलेल्या ५१ हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला़
पोखर्णी येथे भागवत कथा आणि श्री शंकरास सव्वा लक्ष बिल्वार्चन व दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते़ ५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या सोहळ्यात मंगळवारी सायंकाळी ६़११ वाजता दीप पूजा करून दीपोत्सव साजरा करण्यात आला़ या सोहळ्यानिमित्त सकाळी यज्ञ पार पडला़ या वेळी खा़ बंडू जाधव यांची उपस्थिती होती़ ह़भ़प़ उत्तम महाराज मठपती पोखर्णीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भागवत कथेची सांगता झाली़
दीपोत्सव सोहळ्याप्रसंगी डॉ़ संप्रिया राहुल पाटील, भावनाताई नखाते, अंबिका डहाळे, राजेश विटेकर, समशेर वरपूडकर, अंजली आणेराव, गंगाप्रसाद आणेराव, संस्थानचे अध्यक्ष एम़ आऱ वाघ, उमाकांतराव कोल्हे, प्रभाकर डुब्बेवार, संजय लोकरे आदींची उपस्थिती होती़ या सप्ताहात श्री शंकरास सव्वा लाख बेल अर्पण करण्यात आले़ दीपोत्सवामुळे नृसिंह मंदिराचा परिसर उजळून गेला होता़ भाविकांनी ५१ हजार दिवे प्रज्ज्वलित करून हा उत्सव साजरा केला़ यावेळी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Parbhani: Bright light of 3,000 lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.