शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

परभणी : ताकद वाढविण्याचा भाजपचा खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:59 PM

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद वाढविण्याचा खटाटोप सुरु केला असून पहिल्यांदाच हा पक्ष चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे. या उलट यापूर्वी तीन जागा लढविणारा शिवसेना पक्ष आता दोन जागांवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद वाढविण्याचा खटाटोप सुरु केला असून पहिल्यांदाच हा पक्ष चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे. या उलट यापूर्वी तीन जागा लढविणारा शिवसेना पक्ष आता दोन जागांवर आला आहे.जिल्ह्यात १९९० पासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सोबतीने विधानसभेची निवडणूक लढवित आहे. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने फक्त गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला. त्यावेळी या पक्षाचे उमेदवार सीताराम घनदाट यांना २७ हजार २१६ मते मिळाली होती. यावेळी त्यांचा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ज्ञानोबा हरि गायकवाड यांनी पराभव केला होता. १९९५ मध्ये पुन्हा भाजपाकडून या मतदारसंघातून साळवे यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांना १४ हजार ६६६ मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. १९९९ च्या निवडणुकीत भाजपाकडून याच मतदारसंघातून विठ्ठल पुरभाजी गायकवाड यांनी निवडणूक लढविली. यावेळी त्यांना १७ हजार ९९० मते मिळाली होती. तेही या निवडणुकीत तिसºया क्रमांकावर राहिले. २००४ मध्ये मात्र विठ्ठल गायकवाड यांनी ४३ हजार ६५ मते मिळवित अपक्ष सीताराम घनदाट यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये पुन्हा भाजपाने येथून निवडणूक लढविली. डॉ.मधुसूदन केंद्रे हे त्यावेळी भाजपाचे उमेदवार होते. त्यांना ६१ हजार ५२४ मते मिळाली. त्यांचा सीताराम घनदाट यांनी पराभव केला होता. १९९० ते २०१९ पर्यंत फक्त एकवेळा गंगाखेडमधून भाजपाला विजय मिळविता आला. शिवसेना -भाजपाची १९९० ते २०१४ पर्यंत युती असताना शिवसेनेने परभणी, पाथरी, जिंतूर या विधानसभेच्या जागा लढविल्या. तर गंगाखेडची जागा भाजपाकडे होती. २०१४ मध्ये शिवसेना भाजपाची युती तुटली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. यामध्ये गंगाखेडची जागा मित्रपक्ष रासपने तर पाथरीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढविली. परभणी व जिंतूर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाने लढविली. त्यामध्ये परभणीत पक्षाला तिसºया क्रमांकाची ४२ हजार ५१ तर जिंतूरमध्येही तिसºया क्रमांकाची ३० हजार ३१० मते मिळाली. आता २०१९ च्या निवडणुकीत २ आॅक्टोबरपर्यत भाजपा एकही जागा लढवणार नाही, असे चित्र होते. राज्यस्तरावर झालेल्या जागा वाटपात पाथरीची जागा महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गट आणि जिंतूरची जागा राष्ट्रीय समाजपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु, ३ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरावर घडामोडी घडल्या आणि जिंतूर व पाथरीत एबी फॉर्मसह भाजपाच्या इच्छुकांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आता या दोन्ही जागांवर या पक्षाचे उमेदवार लढत आहेत. जेथे भाजपाचे कमळ चिन्ह जिल्ह्यात राहते की नाही, अशी स्थिती असताना अचानक दोन जागांची लॉटरी पक्षाला लागली. उलट शिवसेनीची एक जागा घटली असून दुसºया गंगाखेडच्या जागेवर मित्र पक्षामुळेच सेनेचा कस लागला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या न कळत भाजपाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी केलेली खटाटोप स्पष्टपणे दिसत आहे. आता या दोन जागांवर पक्षाला यश मिळते की नाही, हे २४ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांत पक्षाची फारशी ताकद नाही४जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची फारशी ताकद नाही. जिल्हा परिषदेत पक्षाचे ५ सदस्य निवडून आले असून परभणी महानगरपालिकेत ८ नगरसेवक निवडून आले आहेत. या व्यतिरिक्त परभणी पंचायत समितीत ३, सेलू पंचायत समितीत १, गंगाखेड, पालम, पूर्णा पंचायत समितीत प्रत्येकी २ सदस्य निवडून आले असून गंगाखेड नगरपालिकेत ४ व पालम नगरपालिकेत २ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.४ काही महिन्यांपूर्वी झालेल्या मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळविला आहे. सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे हे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले होते. त्यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. पालममध्ये भाजपचा उपनगराध्यक्ष आहे.४आदलाबदल केलेल्या पाथरी मतदारसंघात भाजपाचा एकही जि.प., पं.स., न.प. सदस्य नाही. मानवतमध्ये नगराध्यक्ष आहे. या उलट गंगाखेड मतदारसंघात भाजपाचे ६ पं.स., ६ न.प. आणि ४ जि.प.सदस्य आहेत.मराठवाड्यात परभणीत पक्ष होता मागे४मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत भाजपची फारसी ताकद नव्हती. १९९० पासून जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने सर्वप्रथम पक्षीय ताकद वाढविण्यास सुरुवात केली. बुथप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. त्यांच्या अनेक वेळा बैठका झाल्या.४ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिला गेला. त्यानंतर शिवसेना-भाजपाची लोकसभेला युती झाली. विधानसभेलाही ती कायम राहिली. २०१४ मध्ये युती नसताना भाजपने दोन जागा लढविल्या. तर शिवसेनेने चारही जागा लढविल्या होत्या. आता २०१९ मध्ये युती असताना शिवसेना आणि भाजप प्रत्येकी दोन जागा लढवित आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीBJPभाजपाcongressकाँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019