परभणी : दारूच्या पैशांसाठी कानाला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:36 IST2019-03-23T23:36:05+5:302019-03-23T23:36:27+5:30

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाच्या कानाचा चावा घेतल्या प्रकरणी २२ मार्च रोजी पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Parbhani: bite the ear for liquor money | परभणी : दारूच्या पैशांसाठी कानाला चावा

परभणी : दारूच्या पैशांसाठी कानाला चावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाच्या कानाचा चावा घेतल्या प्रकरणी २२ मार्च रोजी पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तालुक्यातील आवई येथील दादाराव कोंडीबा पवार हे धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठीचे मंडपाचे काम पाहून घराकडे परत येत होते़ तेव्हा गावातील ज्ञानदेव उद्धव पवार याने दारू पिण्यासाठी १०० रुपयांची मागणी दादाराव पवार यांच्याकडे केली़ पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ज्ञानदेव पवार याने भांडण करून कानाचा चावा घेतला़ या प्रकरणी शुक्रवारी पूर्णा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे़ पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे़

Web Title: Parbhani: bite the ear for liquor money