Parbhani: Barley crops on an area of five lakh hectares | परभणी : पाच लाख हेक्टर क्षेत्रावर बहरली पिके

परभणी : पाच लाख हेक्टर क्षेत्रावर बहरली पिके

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ या क्षेत्रावर १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीही केली़ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग व उडीद या पिकांनी तग धरली असून ही पिके आता चांगलीच बहरात आली आहेत़
तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे २०१९-२० हा खरीप हंगाम तरी शेतकऱ्यांना उभारी देणारा ठरेल, अशी अपेक्षा आह; परंतु, जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यांत पाऊस खंड स्वरुपात झाला़ त्यामुळे याहीवर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी शेतकºयांच्या हातून जातो की काय? अशी शंका शेतकºयांमध्ये निर्माण झाली होती़ परंतु, ३१ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस झाला़ त्यामुळे खरीप हंगामातील पिके सद्यस्थितीत चांगली बहरली आहेत़ त्यामुळे पीक परिस्थिती अशीच राहिली तर तीन वर्षाचा दुष्काळ धुवून शेतकºयांना आर्थिक उभारी देणारा हा खरीप हंगाम ठरणार आहे़
जिल्ह्यामध्ये ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे़ यामध्ये २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे़
त्यानंतर १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे नगदी पिके म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक चांगले बहरले आहे़ त्याचबरोबर कडधान्य पिके ९ हजार ९१, अन्नधान्याची पिके १२५१ हेक्टर, तीळ पीक १० हेक्टर, सूर्यफूल २ हेक्टर अशी पिकांची लागवड झालेली आहे़ त्यामुळे सध्या जिल्ह्यातील शेतकरी समाधानी असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, ४४९ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख नद्या खळाळल्या नाहीत़ त्यामुळे पीक परिस्थिती चांगली असली तरी पाणीसाठा मात्र झालेला नाही़
येलदरी, निम्न दुधना मृत साठ्यातच
४यावर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरी पावसाच्या तुलने जिल्ह्यामध्ये ५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ हा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे़ परिणामी दोन वर्षांपासून कोरडे पडलेले प्रकल्प निम्मा पावसाळा संपल्यानंतरही कोरडेच आहे़ जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पावर परभणी जिल्ह्यासह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे़
४९३४ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये १२४ दलघमी पाणी मृतसाठ्यात साठविले जाते आणि त्यापुढील पाणीसाठा जिवंत साठा म्हणून नोंद घेतला जातो़ मात्र १५ सप्टेंबरपर्यंत या प्रकल्पात केवळ १२२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्याची टककेवारी शून्य टक्के एवढी आहे़ तर दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात आहे़ या प्रकल्पावर सेलू शहरासह इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे़
४सध्या प्रकल्पात जिवंत पाणीसाठा नसल्याने आगामी काळात या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत़ त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील करपरा आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही़ मासोळी प्रकल्पात सद्यस्थितीला १९.०८ दलघमी (४५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ तर करपरा प्रकल्पामध्ये अद्यापही जीवंत पाणीसाठा झालेला नाही़
४दोन आठवड्यांपूर्वी जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीवर बांधलेल्या मुदगल, ढालेगाव, डिग्रस या बंधाºयात पिण्यासाठी पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे काही अंशी या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी भविष्यात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पावरच अवलंबून राहावे लागणार आहे़
साडेतीन महिन्यांत ४४९ मिमी पाऊस
४जिल्हा प्रशासनाच्या तालुकानिहाय पर्जन्यमान अहवालानुसार जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबरपर्यंत ४४९़६९ मिमी पाऊस झाला आहे़ यामध्ये परभणी तालुक्यात ३७९़८९ मिमी, पालम ४१०, पूर्णा ५४९़४०, गंगाखेड ४६९, सोनपेठ ४५५, सेलू ४०४़८०, पाथरी ४६०, जिंतूर ४३३़५० तर मानवत तालुक्यात ४८५ मिमी पाऊस झाला आहे़ विशेष म्हणजे हा पाऊस आतापर्यंत केवळ पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे़
४जिल्ह्याची सरासरी ७७४़६२ मिमी एवढी आहे़ १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ६३१़३४ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे़ परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे केवळ पिके धार्जिणा पाऊस पडल्याने जिल्ह्याला पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने उलटले तरीही दमदार पावसाची अपेक्षा अजूनही आहे़

Web Title: Parbhani: Barley crops on an area of five lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.