परभणी : सावरगाव खून प्रकरणी आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:32 IST2019-01-02T00:32:15+5:302019-01-02T00:32:46+5:30
जमिनीच्या वादातून सख्खा भावाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली आहे.

परभणी : सावरगाव खून प्रकरणी आणखी एकास अटक
परभणी : सावरगाव खून प्रकरणी आणखी एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा (परभणी): जमिनीच्या वादातून सख्खा भावाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली आहे.
जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथे शेती आणि घराच्या जागेच्या वादातून लिंबाजी बाबुराव सोनुळे यांचा २८ डिसेंबर रोजी खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मयताचा धाकटा भाऊ आबाजी सोनुळे (५०) यास ३० डिसेंबर रोजी अटक केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता या ेखून प्रकरणामध्ये मयताचा धाकटा भाऊ मल्हारी बाबुराव सोनुळे हा देखील सहभागी असल्याची माहिती पुढे आली. त्यावरुन मल्हारी सोनुळे (४५) यास अटक करण्यात आली आहे. लिंबाजी व त्यांच्या भावांमध्ये शेती व घराच्या जागेचा वाद काही दिवसांपासून सुरु होता. या वादातूनच दोन धाकट्या भावांनी मोठ्या भावाचा काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी लिंबाजी सोनुळे यांचा मुलगा बाबुराव सोनुळे याने फिर्याद दिली असून त्यावरुन चारठाणा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे तपास करीत आहेत.