परभणी : रोडे खून प्रकरणी आणखी एक आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:51 IST2019-04-02T23:50:58+5:302019-04-02T23:51:22+5:30

शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी एका महिला आरोपीस अटक केली आहे़

Parbhani: Another accused in the murder of Rode, Zerband | परभणी : रोडे खून प्रकरणी आणखी एक आरोपी जेरबंद

परभणी : रोडे खून प्रकरणी आणखी एक आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी एका महिला आरोपीस अटक केली आहे़
३१ मार्च रोजी सकाळी शहरातील जायकवाडी परिसरात नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाला होता़ या घटनेनंतर रवि गायकवाड व किरण डाके हे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले़ या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती़ १ एप्रिल रोजी गायकवाड आणि डाके दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ दरम्यान, मंगळवारी मीनाक्षी नावाच्या महिला आरोपीस अटक केली असून, ४ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोनि रामेश्वर तट यांनी दिली़

Web Title: Parbhani: Another accused in the murder of Rode, Zerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.