परभणीत सोमवारी दिवसभर पावसाची रिमझीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:36 IST2019-07-30T00:35:31+5:302019-07-30T00:36:18+5:30
सोमवारी दिवसभर जिल्ह्यात रिमझीम पाऊस झाला. दिवसभरात एकाही वेळा पावसाचा जोर वाढला नसला तरी ढगाळ वातावरण आणि रिझमीम पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

परभणीत सोमवारी दिवसभर पावसाची रिमझीम
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सोमवारी दिवसभर जिल्ह्यात रिमझीम पाऊस झाला. दिवसभरात एकाही वेळा पावसाचा जोर वाढला नसला तरी ढगाळ वातावरण आणि रिझमीम पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. कधी मध्यम तर कधी रिमझीम पाऊस होत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. एकंदर पावसाळी वातावरण तयार झाले. मात्र मोठा पाऊस झाला नसल्याने जिल्हावासियांचा हिरमोड झाला. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३.८६ मि.मी. पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ६.७५ मि.मी., पूर्णा तालुक्यात ४.६० मि.मी., पालम ३.६७ मि.मी., सेलू ३.८० मि.मी., मानवत ३.६७ मि.मी., पाथरी २.६७ मि.मी. आणि परभणी तालुक्यात २.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १७८ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यात मानवत तालुक्यात सर्वाधिक २३० मि.मी., पूर्णा तालुक्यात २०२.४० मि.मी., परभणी- १५७.४५, पालम : १४३.४९, गंगाखेड : १६५.७५, सोनपेठ : १८५, सेलू : १५६, पाथरी : १७४.३४ आणि जिंतूर तालुक्यात १९२.३३ मि.मी. पाऊस झाला आहे.