परभणी: दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:36 IST2019-09-01T00:35:19+5:302019-09-01T00:36:13+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतचा संभ्रम शेतकºयांमध्ये दोन वर्षानंतरही कायम असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

परभणी: दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतचा संभ्रम शेतकºयांमध्ये दोन वर्षानंतरही कायम असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे़ २०१५-१६ या खरिप हंगामात बी-बियाणे, खते व औषधांची खरेदी करण्यासाठी शेतकºयांनी बँकेची दारे ठोठावली़ शेतकºयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनीही मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीक कर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षातील खरीप व रबी हंगामात शेतकºयांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला़ या दोन्ही हंगामांतून जे काही उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागले़ त्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळाला नाही़ त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक संकट अधिकच गंभीर बनले़ त्यामुळे या आर्थिक कोंडीतून जिल्ह्यातील शेतकºयांनी मृत्यूलाही जवळ केले़
जिल्ह्यासह राज्यातील शेतकºयांची परिस्थिती पाहून राज्य शासनाने मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंमलात आणली़ या योजनेंतर्गत शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले़ राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिवसरात्र एक करून महा- ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र व आॅनलाईन सेंटरच्या समोर शेतकºयांनी रांगा लावल्या व आपले फॉर्म भरून घेतले़ ही योजना अंमलात आणून दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी या योजनेबाबत समाधानी नाहीत़ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २१ राष्ट्रीयकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती व महाराष्ट्र ग्रामीण या शाखेद्वारे २ लाख ३७ हजार ३१ शेतकºयांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती आहे़ ज्या शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली आहे व ज्याचे कर्ज माफ झाले आहे त्यांनाही पुसटशी कल्पना बँक प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने दोन वर्षानंतरही राज्य शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेबाबत शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे़
सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी
राज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांतून होत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे, अशीही मागणी होत आहे़