शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

परभणी : प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:42 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले.

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले.पहिल्या फेरीनंतर...पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना २३ हजार ८३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना १७ हजार ३१ आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना ५ हजार ४८३ मते मिळाली.दुसऱ्या फेरीनंतर...दुसºया फेरीत शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांना ४५ हजार ८८४ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना ३४ हजार ३९८ मते मिळाली होती. वंचित आघाडीचे आलमगीर खान यांना १० हजार २०५ मते मिळाली. या फेरीपासून वंचित आघाडीने राष्ट्रवादीच्या मतपेटीला सुरुंग लावण्यास प्रारंभ केला.पाचव्या फेरीनंतर...पाचव्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांना १ लाख १० हजार २ तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना ८४ हजार ९३३ मते मिळाली. वंचित आघाडीचे आलमगीर खान यांना २८ हजार ९१९ मते मिळाली. या फेरीतही खा.जाधव यांची मताधिक्याची गाडी सुसाट राहिली.दहाव्या फेरीनंतर...दहाव्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांची आघाडी १७७ मतांनी कमी झाली. या फेरीत जाधव यांना २० हजार ३१५ तर विटेकर यांना २० हजार ४९२ मते मिळाली; परंतु, पूर्वीच्या आघाडीअंती जाधव यांना एकूण २ लाख १० हजार ३७५ तर विटेकर यांना १ लाख ८८ हजार ७१ मते मिळाली.त्यामुळे या फेरीअखेर जाधव यांची २२ हजार ३०४ मतांची आघाडी कायम राहिली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना या फेरीत ४ हजार ८२८ मते मिळाली. त्यांची एकूण मतांची बेरीज ५७ हजार ७६८ झाली.पंधराव्या फेरीनंतर...पंधराव्या फेरीत खा. संजय जाधव यांना १७ हजार ४९६ तर विटेकर यांना १९ हजार १३९ मते मिळाली. या फेरीत विटेकर यांना १ हजार ६४३ मतांची आघाडी मिळाली असली तरी जाधव यांच्याकडे यापूर्वीचे मताधिक्य असल्याने त्यांची एकूण ३ लाख ४ हजार ७१८ तर विटेकर यांची २ लाख ८७ हजार ९२३ मते झाली. त्यामुळे जाधव यांच्याकडे १६ हजार ७९५ मतांची आघाडी कायम राहिली.विसाव्या फेरीनंतर...२० व्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांना २३ हजार ५३१ तर राष्ट्रवादीचे विटेकर यांना १८ हजार ५३० मते मिळाली. या फेरीत जाधव यांनी विटेकर यांच्यावर ५००१ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे जाधव यांना एकूण ४ लाख १२ हजार ६५६ तर विटेकर यांना ३ लाख ८७ हजार २७९ मते मिळाली. त्यामुळे जाधव यांच्याकडे २५ हजार ३७७ मतांची आघाडी कायम राहिली.शेवटच्या फेरीनंतर...शेवटच्या २९ व्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांना एकूण ५ लाख ३८ हजार २१४ तर राष्ट्रवादीचे विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ३७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ८३४ मते मिळाली. या फेरीनंतर पोस्टल मते एकूण मतांमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामध्ये जाधव यांना ७२७ तर विटेकर यांना ३७० आणि खान यांना ११२ पोस्टल मते मिळाली. त्यामुळे या अखेरच्या फेरीअंती जाधव यांना एकूण ५ लाख ३८ हजार ९४१ तर विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ आणि आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली. त्यामुळे शेवटच्या फेरी अखेर शिवसेनेचे संजय जाधव यांनी ४२ हजार १९९ अधिकची मते मिळवित राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव करुन दुसऱ्यांदा भारतीय संसदेत पोहण्याचा मान मिळविला.

टॅग्स :parabhaniपरभणीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल