परभणी: प्रशासनाकडून ४०७ विहिरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:44 IST2019-06-08T22:44:29+5:302019-06-08T22:44:59+5:30
पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ४०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ त्यापैकी ८३ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ३२४ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़

परभणी: प्रशासनाकडून ४०७ विहिरींचे अधिग्रहण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ४०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ त्यापैकी ८३ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ३२४ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत़ टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच गाव परिसरातील जलस्त्रोत अधिग्रहीत करून ते पाणी ग्रामस्थांना दिले जात आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ११० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ १४ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ९६ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आले़ तसेच पालम तालुक्यात ८०, परभणी २४, पूर्णा ३८, सोनपेठ २३, सेलू ४१, पाथरी ७, जिंतूर ६३ आणि मानवत तालुक्यामध्ये २१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ पालम तालुक्यात टँकरची संख्या सर्वाधिक असल्याने तब्बल २० विहिरींचे पाणी टँकरसाठी राखीव ठेवले आहे़