परभणी : खून प्रकरणी आरोपीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:27 IST2018-12-25T00:26:59+5:302018-12-25T00:27:32+5:30
येथील जुना मोंढा भागातील महावीर चित्र मंदिराजवळ एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़

परभणी : खून प्रकरणी आरोपीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जुना मोंढा भागातील महावीर चित्र मंदिराजवळ एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़
येथील महावीर चित्रमंदिर परिसरात डोक्यात फरशीचे घाव घालून शेख मोबीन शेख अखिल याचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९़३० च्या सुमारास उघडकीस आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केले़ सहा तासांतच मुख्य आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला बोरी शिवारातून ताब्यात घेतले होते़ दरम्यान, सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पुंगळे यांनी आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा यास न्यायालयासमोर उभे केले़ तपासासाठी पोलीस कोठडीची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली़ त्यारून न्या़ जाधव यांनी आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा यास ३१ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़
भर दिवसा शहरातील बाजारपेठ भागात युवकाचा खून झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली़ पोलिसांना आरोपीकडून प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार शेख मोबीन शेख अखिल हा आरोपीच्या घरासमोर सेल्फी काढत होता़ तसेच सिगारेट ओढत असल्याने हा खून केल्याचे आरोपीने सांगितले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे़