शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

परभणी :९८८ शेतकऱ्यांचे उंचावले मनोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:12 IST

राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक प्रकारे मानसिक आधार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक प्रकारे मानसिक आधार मिळाला आहे.मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतात पिकत नसल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले होते. राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शेतकºयांचे मनोबल उंचावणे आणि त्यांना धीर देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रेरणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या जिल्ह्यात ग्रामस्तरावर शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे.परभणी जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविला जात असून, त्याअंतर्गत वर्षभरातून दोन वेळा सर्वेक्षण केले जाते. त्यात ७ हजार ८३४ शेतकºयांपर्यंत आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहोचले. या शेतकºयांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात ९८८ शेतकरी तीव्र प्रकारात आणि १८३५ शेतकरी मध्यम प्रकारात मोडत असल्याचा अहवाल या प्रकल्पाने काढला.एकंदर हे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत होते. त्यामुळे तीव्र आणि मध्यम प्रकारात मोडणाºया शेतकºयांचे प्रबोधन करण्यात आले. त्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत पुरविण्यात आल्या.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे या शेतकºयांचे मनोबल उंचावले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.दररोज होतो पाठपुरावाप्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात ९८८ शेतकरी अतितीव्र प्रकारच्या मन:स्थितीत असल्याचे आढळले. या शेतकºयांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षातील अधिकारी, कर्मचारी दररोज शेतकºयांचा पाठपुरावा करीत असत. त्यांना काय लागते, त्यांची मन:स्थिती कशी आहे, याबरोबरच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात असते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच अतितीव्र गटातील ९८८ आणि मध्यम गटातील १८३५ शेतकºयांचे मनोबल सध्या उंचावले असून, हे शेतकरी परिस्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिली. या कामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर, मनोविकार तज्ज्ञ डॉ.तारेक अन्सारी, अमरदीप घाडगे, प्रशांत पतंगे, महादेव जाधव, भास्कर काऊतकर आदींनी प्रयत्न केले.आशा सेविकांमार्फत सर्वेक्षणया प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आशा सेविकांमार्फत शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच या आशा सेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले. शेतकरी कोणत्या कारणांमुळे नैराश्यात गेला, याचा शोधही या सेविकांमार्फत घेतला जातो. त्यानंतर मानसिक जिल्हा आरोग्य कार्यक्रमांतर्गत कौटुंबिक समुपदेशन, वर्तणूक उपचार, मानसोपचार व औषधोपचार या माध्यमातून शेतकºयांना मदत केली जाते.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी