शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

परभणी : ७७ गावे दुष्काळापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:37 IST

जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने जाहीर केलेल्या दुष्काळातून जिल्ह्यातील सुमारे ७७ गावांना वगळण्यात आले आहे़ या गावांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे कारण देत ही गावे दुष्काळी योजनांमध्ये समाविष्ट झाली नसली तरी या गावांमध्येही चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने जाहीर केलेल्या दुष्काळातून जिल्ह्यातील सुमारे ७७ गावांना वगळण्यात आले आहे़ या गावांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे कारण देत ही गावे दुष्काळी योजनांमध्ये समाविष्ट झाली नसली तरी या गावांमध्येही चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत़परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४ मिमी एवढी असून, संपूर्ण जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ मोसमी पावसाच्या काळात पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला आणि या तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली़ विशेष म्हणजे पूर्णा तालुक्यातही परतीचा पाऊस झाला नसल्याने रबी हंगामाला फटका बसला आहे; परंतु, या तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडल्याचा फटका दुष्काळी योजनांच्या सवलतीला बसला आहे़ राज्य शासनाने तीन टप्प्यामध्ये दुष्काळाची घोषणा केली़ तिन्ही टप्प्यातील निकषांमध्ये पूर्णा तालुक्यातील पूर्णा, चंडावा, कात्नेश्वर आणि ताडकळस ही चार मंडळे बसली नाहीत़ त्यामुळे या चार मंडळांमधील ७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला नाही़ शासनाने दुष्काळ जाहीर झालेल्या गावात जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज देयकांत ३३़५ टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथीलता, आवश्यक त्या ठिकाणी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये वीज पंपाची जोडणी खंडीत न करण्याच्या सवलती दिल्या आहेत़ मात्र या सवलतींपासून ७७ गावे वंचित राहणार आहेत़ विशेष म्हणजे पूर्णा तालुक्यातील या गावांमध्ये सद्यस्थितीला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाचे प्रमाण अधिक असले तरी या गावात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी रबीच्या पेरण्या रखडल्या असून, संपूर्ण हंगामावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ तसेच सद्यस्थितीला परिसरात पाण्याची टंचाईही निर्माण झाली आहे़ भूजल पातळीत घट होत असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे; परंतु, शासनाच्या निकषात न बसल्याने ही गावे दुष्काळाच्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत़परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३५ मंडळांत दुष्काळपरभणी जिल्ह्यामध्ये ३९ मंडळे असून, त्यापैकी पूर्णा तालुक्यातील चार मंडळे वगळता ३५ मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे़ दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदी व निकषांचा विचार करून पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील परभणी, पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि सेलू या सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला़ त्यामुळे परभणी तालुक्यातील १३१, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६० आणि सेलू तालुक्यातील ९४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली़ दुसºया टप्प्यामध्ये मंडळनिहाय विचार करण्यात आला़ ज्या मंडळांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी सरासरी पाऊस झाला आहे, त्या मंडळांना दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आले़ त्यात गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, बोरी, आडगाव, चारठाणा आणि पूर्णा तालुक्यातील लिमला या मंडळांचा दुष्काळी मंडळांमध्ये समावेश केल्याने २१३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला़ तिसºया टप्प्यामध्ये पैसेवारीचा निकष लावण्यात आला़ ज्या गावांमध्ये अंतीम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, त्या गावात दुष्काळी सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली़ या टप्प्यात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा व बामणी या तीन मंडळांचा समावेश करण्यात आला़ त्यामुळे दुष्काळाच्या यादीत आणखी ८० गावांची भर पडली़ तीनही टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी ३५ मंडळे समाविष्ट झाली आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीRainपाऊस