परभणी : ६९ पोती गुटखा बोरीत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:13 IST2019-02-19T00:13:04+5:302019-02-19T00:13:49+5:30
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बोरी येथील संभाजीनगरात टाकलेल्या छाप्यात तब्बल ६९ पोती गुटखा जप्त केला आहे़

परभणी : ६९ पोती गुटखा बोरीत जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बोरी येथील संभाजीनगरात टाकलेल्या छाप्यात तब्बल ६९ पोती गुटखा जप्त केला आहे़
संभाजीनगरातील एका घरासमोर दोन जीपमध्ये हा गुटखा भरला होता़ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा एमएच ३७ जी-४८२३, एमएच २२एए-३०१६ या दोन गाड्यांमधून गुटख्याचा माल उतरवित असताना दत्तराव रामजी गवारे व जीवन दत्तराव गवारे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ गुटख्याची ३९ मोठी व ३० छोटी पोती आढळली. त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे़ तसेच गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन चालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ ही कारवाई विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच़जी़ पांचाळ, हेकॉ हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, ब्रह्मानंद कोल्हे, अतुल कांदे, दीपक मुंडे, पूजा भोरगे यांनी केली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती़ पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत़