परभणी : पाथरी तालुक्यात पोलिसांनी पकडली ४४ हजारांची देशी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:22 IST2019-04-11T00:21:59+5:302019-04-11T00:22:30+5:30
पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी : पाथरी तालुक्यात पोलिसांनी पकडली ४४ हजारांची देशी दारू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत एम.एच.२२/यु ३०० या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेत दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लिंबा रोडवरील कॅनॉलजवळ ही गाडी थांबवून तपासणी केली असता भिंगरी संत्रा दारूचे १८ बॉक्स गाडीत आढळले. या बॉक्समध्ये दारूच्या ८६४ बाटल्या होत्या. ४४ हजार ९२८ रुपयांची दारू आणि ४ लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी भारत विक्रम गायकवाड याने ही दारू परळी येथील अमर वाईन शॉपचे पिराजी देशमुख यांच्याकडून घेऊन ती लिंबा परिसरात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन येत होता. या प्रकरणी भारत गायकवाड (गंगासागरनगर, परळी जि.बीड), चालक अंकुश ज्ञानोबा आंधळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या दोघांसह गाडी मालक गणेश राठोड (रा.इंदूकवाडी, ता. परळी) आणि पिराजी देशमुख या चौघांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, ज्योती चौरे, आशा सावंत, भगवान सुतारे, हुसेन खान, विशाल वाघमारे यांनी ही कारवाई केली.