परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेत १४७ घरकुले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:12 AM2019-11-27T00:12:39+5:302019-11-27T00:13:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२० पर्यंत प्रशासनाला ३ हजार ६४२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़

Parbhani: 4 houses completed in Pradhan Mantri Awas Yojana | परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेत १४७ घरकुले पूर्ण

परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेत १४७ घरकुले पूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२० पर्यंत प्रशासनाला ३ हजार ६४२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़
देशातील सर्व नागरिकांना २०२२ पर्यंत हक्काचे घरकुल देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे़ या घोषणेंतर्गत परभणी जिल्ह्यात २०२२ पर्यंत १० हजार ३८३ घरकुले केवळ नागरी भागात बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ तर २०२० अखेर ३ हजार ६४२ घरकुलांचे बांधकाम करावयाचे आहे़
या योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे, या उद्देशाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़ परभणी जिल्ह्यातील महानगरपालिका वगळता एक नगर पंचायत आणि ७ नगरपालिकांमध्ये घरकूल बांधकामांचे लाभार्थी निवडण्यात आले आहेत़ या आठही संस्थांमध्ये घरकुल बांधकामांना सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरकुलांच्या उभारणीची गती मात्र संथ आहे़ त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगरपालिका व नगर पंचायत प्रशासनाला प्राधान्याने घरकुलांच्या प्रश्नावर काम करावे लागणार आहे़
पाथरी, गंगाखेड, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा आणि जिंतूर या सात नगरपालिका तसेच पालम नगरपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे़ २०२२ पर्यंत १० हजार ३८३ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवून काम सुरू करण्यात आले असून, ८ हजार ९२९ घरकुलांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यापैकी ५ हजार ७७७ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे़ मात्र आतापर्यंत केवळ १४७ घरकुलेच बांधून तयार झाली असून, उर्वरित ३ हजार ४९५ घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला प्राधान्य क्रमाने ही कामे हाती घ्यावी लागणार आहेत़
प्रशासनाने लाभार्थी निवडून त्यांना घरकूल बांधकामाची परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात घरकुुले उभारणीचे काम संथगतीने असल्याने या लाभार्थ्यांच्या अडचणी काय आहेत? हे समजून घ्यावे लागणार आहे़ त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनानेच एक पाऊल पुढे टाकले तर हे उद्दिष्टही पूर्ण होऊ शकते़ प्रशासनाकडे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़
या काळामध्ये रखडलेली घरकुले पूर्ण करून घेतल्यास शहरी भागात राहणाºया सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते़
वाळूची मोठी समस्या
४घरकुलांचे बांधकाम करीत असताना लाभार्थ्यांना वाळूचा मोठा अडसर निर्माण झाला आहे़ या लाभार्थ्यांना दिल्या जाणाºया अनुदानामध्ये घरकुल बांधून पूर्ण होणे शक्य नाही़
४कारण वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ तसेच वर्षभरापासून खुल्या बाजारपेठेमध्ये वाळू उपलब्ध नाही़
४२० ते २५ हजार रुपये ट्रक या दराने वाळू खरेदी करणे शक्य नसल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत़ निवडलेल्या लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़
पूर्ण झालेले घरकुल
४प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ शहरामध्ये घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ त्यात गंगाखेड नगरपालिकेने १ हजार ७३ घरकुल बांधकामाचा डीपीआर तयार केला असून, ४५६ जणांना बांधकाम परवानगी दिली आहे़ त्यापैकी ६७ जणांनी घरकुल बांधून पूर्ण केले आहे़ सेलू नगरपालिकेने १ हजार १८३ जणांना घरकुल बांधकामाची परवानगी दिली असून, ५ जणांचे घरकुल बांधून पूर्ण झाले आहे़ पालम नगरपंचायतीने ३०० लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी दिली आहे़ त्यापैकी केवळ तिघांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे़ तर जिंतूर नगरपालिकेने १ हजार ५२ जणांना घरकुल बांधकामाची परवानगी देण्यात आली असून, ७२ जणांनी घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे़

Web Title: Parbhani: 4 houses completed in Pradhan Mantri Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.