शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

परभणी : जप्त गुटखा २५ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:09 AM

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता़ रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद केली असता, एमआरपीप्रमाणे २५ लाख रुपयांचा हा गुटखा असून, बाजारभावात याच गुटख्याची किंमत १ कोटीच्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले़ दरम्यान, या छाप्यामध्ये एकूण ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता़ रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद केली असता, एमआरपीप्रमाणे २५ लाख रुपयांचा हा गुटखा असून, बाजारभावात याच गुटख्याची किंमत १ कोटीच्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले़ दरम्यान, या छाप्यामध्ये एकूण ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़तंबाखूजन्य पदार्थ तसेच सुगंधीत तंबाखू आणि गुटखा विक्रीला राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यामध्ये सर्रास गुटख्याची विक्री होते़ या गुटख्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते़ पोलीस प्रशासनाने यापूर्वी गुटखा विक्रीविरूद्ध कारवाया केल्या असल्या तरी या विक्रीला प्रतिबंध लागलेला नाही़सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बोरी येथील कौसडी रस्त्यावरील संभाजीनगर भागात कारवाई केली होती़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना या गुटख्या संदर्भात माहिती मिळाली़ या माहितीच्या आधारे पथकाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संभाजीनगर भागात छापा टाकला होता़ त्यावेळी २ चारचाकी गाड्यांमधून हा गुटखा उतरविला जात असताना पोलिसांनी जप्त केला़ ३९ मोठे पोते आणि ३० छोटे पोते गुटखा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद सुरू होती़ त्यामुळे पकडलेल्या गुटख्याची नेमकी किंमत किती ही माहिती मिळू शकली नाही़ रात्री उशिरानेच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे़विशेष पोलीस पथकातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार २५ लाख ६५ हजार ५९० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ तसेच नगदी १ लाख ३ हजार रुपये, १६ लाख ५० हजार रुपयांच्या दोन चारचाकी गाड्या आणि २७ हजार रुपयांचे मोबाईल असा ४३ लाख १६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल या छाप्यात जप्त करण्यात आला़ या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात गुटख्याचा मोठा साठा आढळल्याने पोलीस अधिकारीही अचंबित झाले आहेत़ ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असला तर जिल्ह्यातील गुटखा विक्रीचा अंदाज बांधता येईल़ दरम्यान, पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत हा गुटखा कोठून आला ? गुटख्याचा मूळ मालक कोण? व्यवहार कसा केला जातो? या अनुषंगाने तपास केला जात आहे़दीड महिन्यांत ५० कारवाया४परभणी येथे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी २७ डिसेंबर २०१८ रोजी विशेष पथकाची स्थापना केली़ जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी हे पथक स्थापन करण्यात आले़ सहाय्यक पोलीस निरीक्षक एऩजी़ पांचाळ, हेकाँ हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, पोकॉ श्रीकांत घनसावंत, ब्रह्मानंद कोल्हे, अतुल कांदे, दीपक मुंडे, पूजा भोरगे यांचा या पथकात सहभाग आहे़ या पथकाने दीड महिन्यांच्या काळात तब्बल ५० कारवाया केल्या आहेत़ विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात या कारवाया केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत़ परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्याचा पर्दाफाशही याच पथकाने केला होता़ त्याच प्रमाणे पालम, गंगाखेड भागात सुरू असलेले व्हिडीओ पार्लर, बिंगो चक्री जुगार आणि उरुसामध्ये सुरू असलेला बांगडी जुगार या कारवायाही या पथकाने केल्या आहेत़ग्रामीण व्यापाºयांना पुरवठा४बोरी परिसरात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा आढळला़ या ठिकाणावरून चार चाकी वाहनांच्या सहाय्याने ग्रामीण भागातील दुकानापर्यंत हा गुटखा पोहचती केला जात होता़४त्यामुळे अवैध गुटखा विक्रीची साखळी तळागाळापर्यंत पोहचल्याचे दिसत आहे़ यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते़ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस