परभणी : २४ कि.मी. कालव्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:26 IST2018-10-08T00:25:39+5:302018-10-08T00:26:43+5:30
जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. कालव्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

परभणी : २४ कि.मी. कालव्याची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. कालव्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. मातीच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने आतापासून नियोजन केल्यास खरीप हंगामातील तूर, कापूस पिकांना पाणी मिळेल. त्याचबरोबर रब्बी हंगाम तोंडावर आल्याने कालव्याची दुरुस्ती करणे गरजेची आहे. करपरा मध्यम प्रकल्पात मोठा पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी पाणी सुटत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन बोरी येथील करपरा प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात शाखाधिकाºयांशी संपर्क साधला असता या कालव्याच्या दुरुस्तीसाठी यंत्र सामुग्री मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती शाखाधिकारी डी.एल. पतंगे यांनी दिली.