परभणी : कृषी औजारांसाठी २२ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:06 IST2019-01-03T00:06:05+5:302019-01-03T00:06:32+5:30
तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली.

परभणी : कृषी औजारांसाठी २२ लाखांचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली.
शेतकºयांना शेतीच्या कामात आधुनिक यंत्राचा वापर करता यावा, यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर कृषी औजारे देण्यासाठी कृषी विभागाने अर्ज मागविले होते. या योजनेसाठी ५५३ प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले होते. यातून शेतकºयांची निवड करण्यासाठी कृषी विभागाने संगणकाद्वारे सोडत घेऊन प्रतीक्षा यादी तयार केली आहे. रोटावेटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र यासह विविध औजारांसाठी यादी तयार करण्यात आली आहे.
२२ लाख रुपयांच्या अनुदानातून शेतकºयांना आर्थिक मदत केली जाणार आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के, मंडळ कृषी अधिकारी गोविंद काळे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण काळे, नायब तहसीलदार कांबळे, कृषी सहाय्यक दत्ता दुधाटे, अरूण दिवसे, संजय कसबे, प्रमोद आनंदराव, वसंत राठोड, अभय हनवते, होळकर आदींसह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.