शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : संचारबंदीत ४३ आरोपींवर २३ गुन्हे ; ४७ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:05 IST

जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणाऱ्या ४३ आरोपींवर आतापर्यंत २३ गुन्हे दाखल झाले असून ४७ वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणाऱ्या ४३ आरोपींवर आतापर्यंत २३ गुन्हे दाखल झाले असून ४७ वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे.जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास ६ महिने ते २ वर्षापर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. असे असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आले. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अशा एकूण ४३ आरोपींवर विविध पोलीस ठाण्यामध्ये २३ गुन्हे दाखल केले आहेत. या व्यक्तींकडील ४७ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आली आहेत.संचारबंदी १४ एप्रिलपर्यंत देशात लागू राहणार असल्याने या संदर्भात विविध ठिकाणी नाकाबंदी, चेक पॉर्इंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून यासाठी नागरिकांनी एकत्र जमू नये, याकरीता सर्व धर्मगुरुंना ते नियमित देखरेख करीत असलेल्या धार्मिकस्थळी धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आली असून इतर नागरिकांना मात्र त्यांच्या घरीच धार्मिक विधी करता येणार आहे. कोणीही अफवा पसरु नये.दुध, फळे, भाजीपाला, कृषीमाल विक्री केंद्रे, किराणा दुकान, बँका, एटीएम, औषधी दुकाने, पाणीपुरवठा विभाग आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी शहरातील रस्त्यावर फिरु नये, सोशल डिस्टन्सीचे पालन करावे. ज्यांना होम कोरोनटाईन करण्यात आले आहे, त्या नागरिकांनी घरी थांबावे, कोरोनाच्या विषाणूपासून सर्र्वांची स्वत:चे संरक्षण करावे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस