शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

परभणी: आदिवासी साहित्याचा ३७३ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:19 PM

आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी दुपारी गंगाखेड येथे दाखल झाल्यानंतर आयोजित जाहीर सभेत खा.कोल्हे बोलत होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.सतीश चव्हाण, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विक्रम काळे, आ.विजय भांबळे, माजी खा. सुरेश जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इसाक जहागीरदार, सुरज चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. म्हणूनच त्यांच्या महाजनादेश यात्रेत पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे. पोलीस बंदोबस्त बाजुला ठेवून यात्रा काढा, तुम्हाला तरुण रस्त्यावर फिरु देणार नाहीत, असेही ते म्हणाले. आदिवासी बांधवांच्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. साहित्याचा नागपूरला एक तर अमरावतीला एक तर नाशिकला एक असे वेगवेगळे दर ठरविले गेले. यातून कोट्यवधी रुपये लुटले गेले. राज्यातील ३५३ पैकी १५१ तालुक्यात दुष्काळ आहे. मुख्यमंत्रीच म्हणाले होते, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मग हे पैसे गेले तरी कुठे, असेही ते म्हणाले.राज्यात गेल्या चार वर्षात १ लाख २५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात १६ हजार ५०० बलात्काराचे तर ३७ हजार ५०० विनयभंगाचे गुन्हे आहेत. माता- भगिनी राज्यात सुरक्षित नाहीत. तुमचा एकमंत्री दारुला बाईचे नाव द्या, असे सांगतो, त्यांना लाज वाटत नाही का? असा सवालही खा.कोल्हे यांनी केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने पाच वर्षात २ लाख ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून राज्य दिवाळखोरीत घातले आहे. सरकारमुळे अनेक शेतकरी जीव देण्याच्या विचारात आहेत. शिक्षकांनीही अवयव विक्रीस काढले आहेत. मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केला.यावेळी अ‍ॅड.मिथिलेश केंद्रे, श्रीकांत भोसले, माधव भोसले, वसंत सिरस्कर, शहाजी देसाई, स.अकबर इमदाद पठाण, हाजी कुरेशी, गिरीष सोळंके, देविदास चव्हाण, लिंबाजी देवकते, अप्पासाहेब जाधव, शंकर वाघमारे, गजानन अंभुरे, कादरभाई गुळखंडकर आदींची उपस्थिती होती.विरोधी पक्षाचा आमदार असल्याने अन्याय -डॉ.मधुसूदन केंद्रे४गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्याने राज्यातील सरकारने विकासकामांसाठी मदत केली नाही. दुष्काळ, पीक विमा देताना आखडता हात घेतला.४शेतकरी विमा योजनेपासून वंचित ठेवले. तरीही विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामांसाठी ४८० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असल्याचे यावेळी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी सांगितले.४शेतकऱ्यांना लुटणारे जेलमध्ये गेले तरी जेलमधून निवडणूक लढविणार असल्याचे म्हणत आहेत. तर बँकेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली गंगाखेड विधानसभेतील शेकडो तरुणांना नोकºया वाटपाचा कार्यक्रम केला जात असल्याची टीका सीताराम घनदाट यांच्यावर यावेळी डॉ. केंद्रे यांनी केली.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण४पाथरी- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.४यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, माजी अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष मीनाताई भोरे, जुनेद दुर्राणी, दादासाहेब टेंगसे, सभापती अनिल नखाते, एकनाथ शिंदे, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नान खान, राजीव पामे, जि.प.सदस्य मीरा टेंगसे, एकनाथ घांडगे, माधवराव जोगदंड, विठ्ठल सूर्यवंशी, मुजाहेद खान, राजेश ढगे आदींची उपस्थिती होती.४दरम्यान, सकाळी १० वाजता मानवत रोड ते पाथरी अशी १५ कि.मी.दुचाकी रॅली काढून शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले.बाजार समित्या मोडीत काढण्याचे काम -पवार४पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीकोनातून काम करणाºया बाजार समित्या मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारकडून सुरु आहे. तसेच राज्यात महिलांवर अन्याय -अत्याचार वाढले आहेत, असेही ते म्हणाले.सभेत उपाध्यक्षाचे पॉकेट मारले४पाथरी येथील राष्ट्रवादीच्या सभेत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम ऊर्फ बंडू शिंदे पाटील यांचे पॉकेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. पॉकेटमध्ये १० हजार रुपये, आधार कार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे होती. याबाबत उत्तम शिंदे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे