परभणी : सहकारी संस्थांसाठी १२ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:57 IST2019-01-07T23:56:06+5:302019-01-07T23:57:25+5:30
सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़

परभणी : सहकारी संस्थांसाठी १२ कोटींचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़
राज्यात सहकारी संस्थांचे नवीन प्रकल्प सुरू होण्याची प्रक्रिया मंदावली आहे़ त्यामुळे या सहकारी संस्थांना सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात अटल महापणन विकास अभियानांतर्गत ५ हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची कार्यवाही २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे़ त्या अंतर्गतच सहकारी संस्थांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती सुरू करण्याच्या दृष्टीकोणातून अटल अर्थसहाय्य योजना राज्य शासनाने सुरू केली आहे़ ग्रामीण विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या, सहकारी संस्थांच्या कृषी व कृषी पूरक उद्योगास प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे़
या योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांना ४९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांसाठी १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे़
या योजनेंतर्गत शेतकºयांच्या शेतमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्य संवर्धन करणे, शेतमाल उत्पादनातून शेतकºयांचा नफा वाढविण्यासाठी तसेच शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागात शेतमालावर प्रक्रिया व विक्री करण्यास प्रोत्साहन देणे, शेतकरी ते ग्राहक यामध्ये असणारी मूल्य साखळी कमी करून शेतकºयांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी सहकारी संस्थांमार्फत विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, जागतिक बाजारपेठेत कृषी व पूरक उद्योगास वाव असलेले उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी बाबींतर्गत कामे करण्याची उद्दिष्टे अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत ठरवून देण्यात आली आहेत़
या योजनेंतर्गत ४० लाख रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत संबंधित सहकारी संस्थांना प्रकल्प उभारण्यासाठी मदत करण्यात येणार असून, यासाठीच्या प्रकल्पांची नावेही सहकार विभागाने दिली आहेत़
या योजनेंतर्गत मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यास ६ कोटी ९० लाख, उस्मानाबाद जिल्ह्यास ११ कोटी ४ लाख, नांदेड जिल्ह्यास २२ कोटी ८ लाख, जालना जिल्ह्यास ११ कोटी ४ लाख, लातूर जिल्ह्यास १३ कोटी ८० लाख, बीड जिल्ह्यास १५ कोटी ८ लाख आणि औरंगाबाद जिल्ह्यास १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़