Parabhani ZP Election: आता बोला! दोन पक्षांचे ए.बी. फॉर्म जोडणाऱ्या खराबे अवैध, मोरे वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 20:13 IST2026-01-23T20:11:15+5:302026-01-23T20:13:43+5:30

अजब न्यायाचा आरोप करीत राष्ट्रवादी व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Parabhani ZP Election: Speak now! The two parties' A.B. forms linked; one invalid, the others are valid | Parabhani ZP Election: आता बोला! दोन पक्षांचे ए.बी. फॉर्म जोडणाऱ्या खराबे अवैध, मोरे वैध

Parabhani ZP Election: आता बोला! दोन पक्षांचे ए.बी. फॉर्म जोडणाऱ्या खराबे अवैध, मोरे वैध

सेलू : कुपटा गटातील योगिता रणजीत मोरे यांनी शिंदेसेना व भाजप, तर वालूर गटातील माधुरी राम खराबे यांनी राष्ट्रवादी व उद्धवसेनेचा ए. बी. फॉर्म जोडला होता. यावरील आक्षेपाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी शोभा जाधव यांनी गुरुवारी रात्री ८:३० वा. निकाल दिला. यामध्ये योगिता मोरे यांचा भाजपचा अर्ज वैध ठरला, तर माधुरी खराबे यांचे दोन्ही पक्षांचे अर्ज अवैध ठरले. मात्र, खराबेंचा अपक्ष अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

योगिता मोरे यांनी अगोदर शिंदेसेना व नंतर भाजप असा ए. बी. फार्म जोडल्याने दोन्ही अर्ज अवैध करा, अशी मागणी शिंदेसेनेचे संदीप लहाने, राष्ट्रवादी (अ. प.)चे प्रकाश मुळे व भाजपचे शिवहरी शेवाळे यांनी केली होती. त्यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेतला होता. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी (अ. प.)च्या माधुरी राम पाटील यांनी राष्ट्रवादी व उद्धवसेनेचे दोन ए. बी. फॉर्म लावले होते. त्यामुळे साडेगावकर व शैलेश तोष्णीवाल यांनी आक्षेप घेत दोन्ही अर्ज अवैध करा, अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूंनी युक्तीवाद आला. यात मोरे यांना मात्र भाजपचा उमेदवार घोषित केले तर खराबे यांचे दोन्हीही पक्षीय ए. बी. फॉर्म बाद ठरविण्यात आले.

दरम्यान, दोन्ही आक्षेप सारखे असताना दोन वेगवेगळे निर्णय कसे? यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाबा विचारण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. नगरसेवक मिलिंद पवार, संदीप लहाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी अर्धा तास ठिय्या मांडत प्रशासनाला जाब विचारला. परंतु, प्रशासनाने निकाल कायम ठेवला.

प्रशासनावरील नाराजीने घोषणाबाजी
या प्रकारानंतर राष्ट्रवादी व उध्दवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून लोकशाही जिवंत ठेवा, अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनाने अन्याय केला, तरीही जनता अन्याय करणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढू आणि जनता जनार्दनाच्या भरवशावर ती जिंकू, असा निर्धार केला.

काळे यांचा अर्ज वैध
सोन्ना गणातील रंजना काळे यांच्या विरोधात निर्मला काळे यांनी आक्षेप घेत शौचालय नसताना चुकीचे शपथपत्र दिल्याचे म्हटले होते. दरम्यान, विस्तार अधिकारी पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शौचालय आहे, असा अहवाल दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी हा अर्ज वैध ठरवला.

Web Title : परभणी ZP चुनाव: खराबे का एबी फॉर्म अवैध, मोरे का वैध

Web Summary : परभणी ZP चुनाव में, मोरे का बीजेपी फॉर्म वैध, जबकि खराबे के दो पार्टियों के फॉर्म अवैध, लेकिन स्वतंत्र फॉर्म वैध है। समर्थकों ने प्रशासनिक पक्षपात का आरोप लगाते हुए अलग-अलग फैसलों का विरोध किया। विरोध के बावजूद, प्रशासन ने अपना फैसला बरकरार रखा। शौचालय सुविधा के सत्यापन के बाद काले का आवेदन मान्य किया गया।

Web Title : Parbhani ZP Election: Kharabe's AB Form Invalid, More's Valid

Web Summary : In Parbhani ZP election, More's BJP form was valid, while Kharabe's forms from two parties were invalid, but her independent form is valid. Supporters protested the differing decisions, alleging administrative bias. Despite protests, the administration upheld its decision. Kale's application was validated after verification of toilet facility.