वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत 

By विजय पाटील | Updated: February 9, 2026 12:06 IST2026-02-09T12:06:22+5:302026-02-09T12:06:41+5:30

एकाच कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न परभणीच्या सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला

Parabhani ZP Election Result 2026: Parbhanikars' blow to Suresh Warpudkar's dynastic rule! Son, daughter, daughter-in-law and nephew in the shadow of defeat | वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत 

वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत 

परभणी: जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून दबदबा असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल काळजाचा ठोका चुकवणारे ठरले आहेत. एकाच कुटुंबातील पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून नशीब आजमावत असताना, मतदारांनी घराणेशाहीला कडाडून विरोध करत चार सदस्यांना पराभवाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे.

सत्तेसाठी कुटुंब विखुरले, पण मतदार एकवटले! 
वरपूडकर कुटुंबातील सदस्यांनी यंदा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची तिकीटे खिशात घातली होती. भाजपच्या तिकीटावर लढलेले सुपुत्र समशेर वरपूडकर (सिंगणापूर गट), सून प्रेरणा वरपूडकर (दैठणा) आणि पुतण्या उत्कर्ष वरपूडकर (लोहगाव गट) या तिघांवरही पराभवाची गडद छाया आहे. दुसरीकडे, उद्धवसेनेकडून झरी सर्कलमध्ये नशीब आजमावणाऱ्या कन्या सोनल वरपूडकर या दोन हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर असल्याने त्यांचाही पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.

अजित वरपूडकरांनी वाचवली 'लाज' 
एकीकडे कुटुंबातील चार दिग्गज पराभूत होत असताना, काँग्रेसच्या चिन्हावर लोहगाव सर्कलमध्ये लढणारे पुतण्या अजित अनिल वरपूडकर यांनी मात्र वरपूडकर घराण्याची अब्रू राखली आहे. चौथ्या फेरीअखेर त्यांनी हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली असून, ते विजयाच्या दिशेने कूच करत आहेत.

मतदारांनी शिकवला धडा
एकाच कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न परभणीच्या सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला असून, हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारा ठरणार आहे.

Web Title : परभणी ZP चुनाव: मतदाताओं ने वरपुडकर परिवार के राजनीतिक वंशवाद को नकारा।

Web Summary : परभणी में, मतदाताओं ने वरपुडकर परिवार के सत्ता को मजबूत करने के प्रयास को खारिज कर दिया। विभिन्न पार्टियों से चार पारिवारिक सदस्यों को हार का सामना करना पड़ा। केवल कांग्रेस के अजीत वरपुडकर ने जीत हासिल कर परिवार की प्रतिष्ठा बचाई। परिणाम जिला राजनीति में एक महत्वपूर्ण बदलाव का संकेत देते हैं।

Web Title : Parbhani ZP Election: Voters Reject Varudkar Family's Political Dynasty Bid.

Web Summary : In Parbhani, voters rejected the Varudkar family's attempt to consolidate power. Four family members from different parties faced defeat. Only Ajit Varudkar of Congress secured a victory, saving the family's reputation. The results signal a significant shift in district politics.