परभणी जिल्हा परिषदेत भाजप 'सर्वात मोठा पक्ष', पण सत्तेसाठी मित्रपक्षांची जोड हवीच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:22 IST2026-02-09T18:22:02+5:302026-02-09T18:22:15+5:30

विटेकर, बोर्डीकर आणि गुट्टेंचे आपापल्या बालेकिल्ल्यात वर्चस्व

Parabhani ZP Election Result 2026: BJP is the 'largest party' in Parbhani, but alliances are needed for power! | परभणी जिल्हा परिषदेत भाजप 'सर्वात मोठा पक्ष', पण सत्तेसाठी मित्रपक्षांची जोड हवीच! 

परभणी जिल्हा परिषदेत भाजप 'सर्वात मोठा पक्ष', पण सत्तेसाठी मित्रपक्षांची जोड हवीच! 

परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता 'खिचडी' निकालाचा कौल दिला आहे. भारतीय जनता पक्ष २४ जागांसह जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला २८ चा आकडा त्यांना गाठता आलेला नाही. परिणामी, आता सत्ता स्थापनेसाठी जिल्ह्यात मोठी फोडाफोडी किंवा मित्रपक्षांशी तडजोड करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठांची खेळी आणि बोर्डीकर-गुट्टेंची सरशी 
निवडणुकीच्या ऐन वेळी भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून पालकमंत्र्यांना आदेश मिळाले आणि आ. रत्नाकर गुट्टे यांच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. या खेळीचा भाजपला मोठा फायदा झाला. एकूण ५४ जागांपैकी भाजपने २४ जागांवर विजय मिळवला. यात आ. गुट्टे यांच्या मतदारसंघातील ९, तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर-सेलू मतदारसंघातील ११ जागांचा समावेश आहे. बोर्डीकरांनी जिल्ह्यावरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेची स्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) १५ जागांवर समाधान मानावे लागले असले, तरी आ. राजेश विटेकर यांनी पाथरी, सोनपेठ आणि मानवत या तिन्ही पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून आपले वर्चस्व कायम राखले आहे. दुसरीकडे, उद्धवसेनेला मोठा फटका बसला असून त्यांच्या जागा ६ वरून घसरल्या आहेत. मात्र, शिंदेसेनेने ५ जागा जिंकून सर्वांना चकित केले आहे. काँग्रेसच्याही ३ जागा कमी झाल्या असून त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

पंचायत समित्यांचे चित्र:

भाजपचे वर्चस्व: सेलू, जिंतूर, गंगाखेड, पालम (एकूण ४)

राष्ट्रवादीचे वर्चस्व: पाथरी, सोनपेठ, मानवत (एकूण ३)

त्रिशंकू: परभणी आणि पूर्णा

Web Title : परभणी में भाजपा सबसे बड़ी, परिषद में सत्ता के लिए सहयोगियों की जरूरत।

Web Summary : परभणी जिला परिषद के नतीजे मिले-जुले हैं। भाजपा सबसे बड़ी है लेकिन बहुमत नहीं है। सत्ता के लिए गठबंधन या दलबदल की जरूरत है। वरिष्ठ भाजपा रणनीतियों ने मदद की, खासकर गुट्टे और बोर्डिकर के लिए। एनसीपी का कुछ समितियों पर दबदबा। शिवसेना में गिरावट; शिंदे की सेना ने चौंकाया।

Web Title : BJP largest in Parbhani, needs allies for power in council.

Web Summary : Parbhani Zilla Parishad results are mixed. BJP is largest but lacks majority. Coalitions or defections are needed for power. Senior BJP strategies helped, especially for Gutté and Bordikar. NCP dominates some committees. Shiv Sena declined; Shinde's Sena surprised.