Parabhani ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात ८.९२ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:52 IST2026-02-07T11:51:19+5:302026-02-07T11:52:09+5:30

परभणी जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषद गट व १०८ पंचायत समिती गणासाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.

Parabhani ZP Election: 8.92 percent voting in two hours for Zilla Parishad, Panchayat Samiti elections | Parabhani ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात ८.९२ टक्के मतदान

Parabhani ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात ८.९२ टक्के मतदान

-संतोष मगर
परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी ७.३० वाजता जिल्ह्यातील १२७८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ८.९२ टक्के मतदान झाले.


परभणी जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषद गट व १०८ पंचायत समिती गणासाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील बाराशे १२७८ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळपासूनच ग्रामीण विविध मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत गंगाखेडमध्ये ७.७० टक्के, सेलूमध्ये ९.७६, मानवत ७.५४, पाथरी ९.४४, सोनपेठ ८.१२, जिंतूर ९.५२, पूर्णा ९.५५, पालम ९.०५, परभणी ८.६७ मतदान झाले होते. यात सर्वाधिक मतदान हे सेलूमध्ये झाले आहे.

Web Title : परभणी ZP चुनाव: पहले दो घंटों में 8.92% मतदान

Web Summary : परभणी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव सुबह 7:30 बजे शांतिपूर्वक शुरू हुआ। सुबह 9:30 बजे तक, 8.92% मतदाताओं ने 1278 मतदान केंद्रों पर अपने वोट डाले। सेलू में सबसे अधिक मतदान दर्ज किया गया।

Web Title : Parbhani ZP Election: 8.92% Voter Turnout in First Two Hours

Web Summary : Parbhani Zilla Parishad and Panchayat Samiti elections began peacefully at 7:30 AM. Until 9:30 AM, 8.92% of voters had cast their ballots across 1278 polling centers. Selu recorded the highest turnout.