Parabhani: प्रसूती झालेली महिला बाळाला सोडून बेपत्ता; नवजात बाळाची प्रकृती नाजूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:46 IST2025-09-05T15:46:33+5:302025-09-05T15:46:50+5:30
या प्रकरणाची नोंद कोतवाली पोलिस ठाण्यात केली असून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Parabhani: प्रसूती झालेली महिला बाळाला सोडून बेपत्ता; नवजात बाळाची प्रकृती नाजूक
परभणी : मानवत ते सेलू रेल्वे प्रवासादरम्यान १३ ऑगस्टला अर्चना गणपत निकम (रा. आंबेडकरनगर, नांदेड (रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार) या महिलेची प्रसूती झाली. सेलू प्राथमिक उपचार केंद्रात प्राथमिक उपचारानंतर तिला व बाळाला परभणी स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना महिला कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेली आहे.
बेपत्ता महिला किंवा तिच्या नातेवाईकांबाबत कुणाला काही माहिती असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, परभणी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन १०९८, कोतवाली पोलिस ठाणे, स्त्री रुग्णालय, बालकल्याण समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे. नवजात बाळाची प्रकृती नाजूक असून त्याची काळजी स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू दक्षता विभाग तसेच आशा शिशू गृह, परभणी येथील कर्मचारी घेत आहेत. या प्रकरणाची नोंद कोतवाली पोलिस ठाण्यात केली असून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गंभीर घटनेमुळे यंत्रणेची सुद्धा धावपळ सुरु झाली आहे.