Parabhani: कार्यक्रमात नशेत नागडे फिरल्याने थापड मारली; सूडात काकाने पुतण्याची हत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:45 IST2025-08-30T12:40:03+5:302025-08-30T12:45:16+5:30

रागाची परिसीमा! फक्त एका थापडीमुळे काकाने पुतण्याचा जीव घेतला

Parabhani: Man slapped for walking around naked in a drunken state at a program; Uncle kills nephew in revenge | Parabhani: कार्यक्रमात नशेत नागडे फिरल्याने थापड मारली; सूडात काकाने पुतण्याची हत्या केली

Parabhani: कार्यक्रमात नशेत नागडे फिरल्याने थापड मारली; सूडात काकाने पुतण्याची हत्या केली

पूर्णा ( परभणी ) : १ ऑगस्ट रोजी भाचीच्या वाढदिवशी दारू पिऊन नागडे का फिरता, असे म्हणत काकाच्या कानशिलात मारली. याचा राग आल्याने त्याने पुतण्याच्या छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथे घडली.

१ ऑगस्ट रोजी भाचीच्या वाढदिवसाच्या स्वयंपाकाच्या कार्यक्रमात दिगंबर सोपान निवडंगे हा दारू पिऊन आला होता. यावेळी तो लोकांशी वाद घालत होता. भाचीच्या नातेवाइकांच्या घरात घुसला. त्यामुळे घरातील लोकांनी त्याला बाहेर काढले. घरी परत जाताना दिगंबर नालीत पडला; तो सर्व अंगावरून कपडे काढून बिनाकपड्याच्या फिरू लागला. या कारणास्तव नातेवाइकांनी पोलिसांना फोन केला. देवीदास सोपान निवडंगे व स्वप्नील देवीदास निवडंगे हे त्यानंतर तेथे आले. त्याच्या या वागण्यामुळे थापड मारून घरी नेले. तेव्हापासून दिगंबर रागावलेला होता.

घराबाहेर खेचले, छातीत चाकू खुपसला
२९ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास देवीदास व त्यांचा मुलगा स्वप्नील व कुटुंबीय घरी झोपलेले होते. त्यावेळी आरोपी दिगंबर त्यांच्या घरासमोर आला. दरवाजावर दगड मारू लागला. तसे न करण्याची विनंती केली तरी ऐकत नव्हता. त्यावेळी स्वप्नील आतून बाहेर आला. तेव्हा दिगंबरने माझे हेडफोन दे म्हणून वाद केला. "माझ्याकडे तुमचे हेडफोन नाहीत." असे म्हणताच दिगंबरने स्वप्नीलचा गळा धरला आणि घराबाहेर खेचत खाली पाडले. त्याच्या अंगावर बसला आणि खिशातून चाकू काढून त्याच्या छातीच्या मध्यभागी घालून मारले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात
हे भयंकर दुष्य पाहून स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली. गावातील लोक धावून आले. त्यांनी दिगंबरला बाजूला केले. मात्र, तोपर्यंत स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गावकऱ्यांनी त्याला कारमध्ये टाकून नांदेड येथील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात दिगंबरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Parabhani: Man slapped for walking around naked in a drunken state at a program; Uncle kills nephew in revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.