शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

परभणीत बदलते राजकीय वारे, भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धवसेनेला मताधिक्य

By ज्ञानेश्वर भाले | Updated: June 6, 2024 13:53 IST

Parabhani lok sabha election 2024: परभणी लोकसभेत संजय जाधवांनी केली विजयी हॅट्ट्रिक 

Parabhani lok sabha election 2024: परभणी : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी महायुतीच्या महादेव जानकरांचा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. या निवडणुकीत जाधव यांनी जानकरांचा तब्बल एक लाख ३४ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करीत परभणी सेनेचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. विशेष म्हणजे भाजपचे आमदार असणाऱ्या जिंतूर, परतूर विधानसभा मतदारसंघातसुद्धा उद्धवसेनेच्या उमेदवारास मोठे मताधिक्य मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर निश्चितच परिणाम होणार असल्याची स्थिती आहे.

वास्तविक, पाहता या निवडणुकीच्या काळात महायुतीच्या माध्यमातून रासपतर्फे जानकर, तर महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेच्या जाधव यांच्यात तूल्यबल लढत होईल असे वाटले होते. कारण जातीय मतांच्या ध्रुवीकरणावर झालेली निवडणूक अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी लागलेल्या निकालात खासदार जाधव यांना ६ लाख १ हजार ३४३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जानकर यांना ४ लाख ६७ हजार २८२ मते पडली. तिसऱ्या स्थानी वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डख यांना ९५ हजार ९६७ मते घेण्यात यश आले.

मतदारसंघात प्रत्येकी तीन-तीन आमदारया लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडी आणि महायुतीकडे विधानसभानिहाय प्रत्येकी तीन-तीन आमदारांचे प्राबल्य होते. यात परभणी, पाथरी आणि घनसावंगी हे मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने, तर गंगाखेड, जिंतूर आणि परतूर विधानसभेच्या आखाड्यात महायुतीच्या बाजूने असणारे आमदार होते. या ठिकाणाहून महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळणे अपेक्षित असतानासुद्धा गंगाखेड वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेच्या संजय जाधव यांनी बाजी मारत आघाडी घेतली.

परतूर, जिंतूर पडले मागेया निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर या विद्यमान आमदार असून, परतूरमध्ये आमदार बबनराव लोणीकर भाजपचे नेतृत्व करतात. यासह महायुतीचा घटक पक्ष आणि महादेव जानकर यांच्या रासपचे आमदार असलेले डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेडमध्ये महायुतीला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र, गंगाखेडमध्ये अवघ्या सहा हजार ७११ मतांची आघाडी सोडता इतर कुठेही महायुतीच्या उमेदवाराचा प्रभाव दिसला नाही. दुसरीकडे जिंतूर आणि परतूरमध्ये भाजपचे आमदार असूनसुद्धा उद्धवसेनेच्या उमेदवाराला मोठी लीड घेण्यात यश आले.

भांबळे, राठोड यांची दमदार कामगिरीजिंतूर विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असला तरी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारास रोखण्याचे काम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केले. महाविकास आघाडीत येथे फूट पडली असतानासुद्धा भांबळे यांनी एकतर्फी खिंड लढवीत खासदार जाधव यांना १२ हजार ६४५ मताधिक्य मिळवून दिले, तर दुसरीकडे परतूरमध्ये आ. लोणीकरांचे आव्हान पेलत आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी उद्धवसेनेच्या उमेदवारासाठी दमदार काम करीत त्यांना २५ हजारांपेक्षा अधिक लीड मिळवून दिली. विशेष म्हणजे हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपचे असतानासुद्धा उद्धवसेनेच्या बाजूने लीड देणारे ठरले.

विधानसभा संजय जाधव, महादेव जानकर, पंजाब डखजिंतूर १००५०० - ८७८५५-  १४८६७परभणी १०८३७४ - ६५९७४ - १५०५९गंगाखेड १०१११७ - १०७८२८ - १९०६३पाथरी १११९०६ - ८२७३५ - १८४९९परतूर ८५०६० - ५९७१६ - १४९२२घनसावंगी ८९९१४ - ५९६५६ - १२९८४पोस्टल ४४७२ - ३५१८ - ५७३एकूण ६०१३४३ - ४६७२८२ - ९५९६७

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४