सेलू (परभणी): शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये, त्यातच आता खासगी सावकारीच्या त्रासाची भर पडली आहे. सेलू तालुक्यातील हादगाव पावडे येथील ५५ वर्षीय शेतकरी प्रभाकर उत्तमराव पावडे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सावकाराच्या जाचामुळेच हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
प्रभाकर पावडे यांनी झाडाला गळफास घेतल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी त्यांच्या शरीराची थोडी हालचाल दिसत असल्याने ग्रामस्थांनी तातडीने त्यांचा फास सोडून त्यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य? प्रभाकर पावडे यांच्या आत्महत्येमागे एका खासगी सावकाराचा मानसिक छळ असल्याचे समोर येत आहे. "एका सावकाराने व्याजाच्या पैशासाठी सतत तगादा लावला होता. सोमवारी त्याने मोबाईलवर फोन करून धमक्या दिल्या होत्या, त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे," असा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दबावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि त्यांच्या पथकाने रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मोबाईल रेकॉर्डिंग आणि नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रभाकर पावडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा मोठा परिवार असून, कुटुंबाचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : A 55-year-old farmer in Parbhani, burdened by private moneylender harassment, committed suicide. Relatives allege constant threats and pressure from a loan shark drove him to this extreme. Police are investigating the mobile recording of threats and have registered a case of accidental death, initiating further inquiry based on family complaints.
Web Summary : परभणी में एक 55 वर्षीय किसान ने साहूकार के उत्पीड़न से तंग आकर आत्महत्या कर ली। परिजनों का आरोप है कि कर्ज देने वाले ने लगातार धमकियां दीं और दबाव बनाया, जिससे मजबूर होकर उसने यह कदम उठाया। पुलिस धमकी की मोबाइल रिकॉर्डिंग की जांच कर रही है और आकस्मिक मौत का मामला दर्ज कर, परिवार की शिकायतों के आधार पर आगे की जांच शुरू कर दी है।