परभणी: परभणी शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी आगीचा एक भीषण थरार पाहायला मिळाला. सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका चालत्या ऑटोरिक्षाला अचानक आग लागली. आगीचा भडका उडण्यापूर्वीच प्रवासी आणि चालक रिक्षातून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे.
ही घटना वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात घडली असून, यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
डोळ्यादेखत रिक्षाचा कोळसामिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून चालक आणि प्रवाशांनी तात्काळ खाली उड्या घेतल्या. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण रिक्षा आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. ही आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते. भररस्त्यात रिक्षा जळत असल्याचे पाहून वाहनधारकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलीस प्रशासनाची घटनास्थळी धावघटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत जळणारी रिक्षा बाजूला केली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
वाहतुकीचा खोळंबा आणि नागरिकांची गर्दीया आगीच्या घटनेमुळे वसमत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुहेरी रांगा लागल्या होत्या. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे केला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाहनांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
Web Summary : A moving auto-rickshaw in Parbhani caught fire, reducing it to ashes. Passengers and the driver escaped unhurt. The incident disrupted highway traffic near Vasantrao Naik statue. Police are investigating a possible short circuit as the cause.
Web Summary : परभणी में वसमत राष्ट्रीय राजमार्ग पर चलती ऑटो-रिक्शा में आग लग गई। यात्री और चालक सुरक्षित बाहर निकल गए। आग में रिक्शा पूरी तरह जल गई। पुलिस शॉर्ट सर्किट की आशंका से जांच कर रही है।