शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 5:04 PM

पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम (परभणी ) : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम तालुक्यात यावर्षी १२ हजार ७९१ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली़ सुरुवातीपासूनच या पिकामागे शुक्लकाष्ट लागले आहे़ त्यामुळे कापूस पिकाने यावर्षी धोका दिला़ सुरुवातीला पावसाने दगा दिला़ काही शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्यावर पीक जगविले़ तसेच परतीच्या पावसाने पिकाला दिलासा मिळाला होता़ परंतु, काही दिवसातच कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे़ अख्खे कापसाचे क्षेत्र बोंडअळीच्या आहारी गेल्याने शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करून जगविलेल्या कापूस पिकातून फारसे उत्पन्न निघाले नाही़ 

कापूस पिकाचे पंचनामे करावेत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत़ परंतु, पालम तालुक्यामध्ये पंचनाम्याच्या प्रक्रियेला फारशी गती आलेली नाही़ दहा दिवसांपासून पंचनामे सुरू असले तरी कर्मचारी वर्गाची कमतरता अडथळा ठरत आहे़ ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक हे संयुक्तरित्या सर्वेक्षण करीत आहेत़ जीपीएस टॅगींग व प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका  गावाला १० ते १२ दिवसांचा कालावधी लागत आहे़ या तिन्ही कर्मचा-यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने कसरत करावी लागत आहे़ आतापर्यंत केवळ ३ ते ४ हजार हेक्टरचा सर्वे झाला आहे़ या सर्वेक्षणाला आणखी महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे़ पथकातील कर्मचारी इतर कामे बंद ठेवून पंचनामे करीत असल्याने इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे़ 

१ लाख ९१ हजार क्षेत्र बाधितपरभणी जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सर्वच्या सर्व क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे़ पालम तालुक्यात १२ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर ५ हजार २२० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे़ आतापर्यंत ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत़ आणखी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे आव्हान या कर्मचार्‍यांसमोर  आहे़ 

टॅग्स :cottonकापूसparabhaniपरभणी