शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

Pankaja Munde: ताई नाही तर भाजप नाही, पंकजा मुडेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी फुंकलं रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 3:08 PM

भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला

परभणी - भाजपने राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी राज्यातील उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे विधानपरिषदेसाठी पंकजा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षाने गोपीनाथ मुंडेंच्या दोन समर्थकांना उमेदवारी दिली. पण, पंकजा मुंडेंना डावललं आहे. विधानपरिषदेत संधी न मिळाल्याने पंकजा मुडेंच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. ताई नाही, तर भाजप नाही... अशा आशयाची बॅनरबाजीही करण्यात आली आहे. 

भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी हे विरोधकांचे काम आहे, हल्लेखोर भाजपचे किंवा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसरीकडे परभणी आणि गंगाखेड तालुक्यातील मुंडे समर्थकांनी ताई नाही, तर भाजप नाही... असे बॅनर सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. 

गंगाखेड तालुक्यातील एका महिला भाजप कार्यकर्त्यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. विधानपरिषद उमेदवारी डावलल्याच्या निषेधार्थ गंगाखेड तालुक्यात कमळ चिन्ह हद्दपार करणार समस्त समाज बांधव... ताई नाही, तर भाजप नाही, अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे. छाया मुंडे असं या पंकजा समर्थकांचं नाव असून त्या पंचायत समिती सभापती आहेत.  

राज्यातील राज्यसभा आणि विधानपरिषद दोन्ही निवडणुकीत भाजपच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. माझे काही मागणे नाही, पण संधी मिळाली तर सोने करून, असे जाहीर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. विधानसभेत परळी येथून पराभव झाल्यापासून राज्यातील राजकारणातून त्यांना बाजूला करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीही पंकजा मुडेंना उमेदवारी न दिल्याने भाजपवर टिका केली आहे. 

पंकजा मुंडेंसाठी आम्ही प्रयत्न केले

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांना का डावलण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळी कोरी पाकीटं असतो. जो पत्ता लिहील तो जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते. पण, निर्णय हा संघटना करते. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. पंकजा ताईंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाparbhani-acपरभणीVidhan Parishadविधान परिषद