नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांनी विजय संपादन केला. निकालानंतर राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ...
ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशि ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला ११ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, या अंतर्गत ८४ ठिकाणी सिमेंट व कोल्हापुरी बंधारे उभारण्यात येणार आहेत़ ...
केबीसी कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्या़ डी़ व्ही़ कश्यप यांनी ५ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत़ ...
महानगरपालिकेच्या वीज बिलांपोटी महावितरणकडे जमा केलेल्या रकमेपैकी ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मनपाचा विद्युत सहायक अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास पोलिसांनी अडीच महिन्यानंतर अटक केली आहे. ...
नोटबंदी, जीएसटीमुळे एकीकडे बाजारपेठेत मंदी असली तरी दुसरीकडे मटका, जुगार मात्र तेजीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. मंगळवारी आणि बुधवारी शहरात फेरफटका मारला तेव्हा दोन्ही दिवस अर्ध्या भागातील मटक्याच्या बुक्या बंद असल्याचे तर अर्ध्या भ ...
पाथरी शहरात तीन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेग वेगळ्या पथकाने 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाडी टाकून 7 लाख 90 हजार रुपयांचा अवैध गुटखा पकडून मोठी कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रथमच धाड पडल्याने आ ...
केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. ...
बीएसएनएल अधिकारी व कर्मचा-यांना तिसरा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचा-यांनी १२ डिसेंबरपासून संप पुकारला असून, जिल्ह्यात दुस-या दिवशीही कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते़ परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १७६ अधिकारी, ...
शहरातील गांधी पार्क भागात विना परवाना केलेल्या बांधकामावर मनपाच्या पथकाने आज दुपारी १२ च्या सुमारास कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त करण्यात आले. ...