परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून साधारणत: दोन दिवसांमध्ये राहटी येथील बंधाºयात पाणी पोहचेल. ...
हिंगोली आगारातील एका बडतर्फ वाहकाने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला. ...
शहरी भागांमध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून रॉकेल ऐवजी गॅसचा वापर वाढावा, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शहरी भागासाठी दिला जाणारा रॉकेलचा कोटा टप्प्याटप्प्याने रद्द करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...
जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन धर्मशाळा बांधकाम व ३ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी एकूण ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला असून सदरील निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. ...
सिंचनासाठी मूबलक पाणी असताना वीज कंपनी अडवणूक करीत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकºयांसह शिवसैनिक ...