शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 8:11 PM

शिक्षक पात्रता परीक्षेबरोबरच डी.एड. व बी.एड. ही शैक्षणिक अर्हता धारण करणेही अनिवार्य

ठळक मुद्दे १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतन दिले जाणार नाहीशिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या शिक्षकांची सेवा समाप्त होणार

परभणी : राष्ट्रीय शिक्षकशिक्षण परिषदेच्या निकषानुसार  शैक्षणिक व व्यावसायिक (टीईटी) पात्रता परिक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाव्हुळ यांनी ३० डिसेंबर रोजी काढले आहेत. त्यामुळे या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायद्यानुसार शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. या प्राधिकरणाने प्राथमिक शिक्षकांसाठी (पहिली ते आठवी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. ही अर्हता ३१ मार्च २०१९ अखेर धारण करणे शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अनिवार्य केले आहे. तसेच या निकषानुसार शिक्षक पात्रता परीक्षेबरोबरच डी.एड. व बी.एड. ही शैक्षणिक अर्हता धारण करणेही अनिवार्य केले आहे.

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २४ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयानुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण न करणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी वंदना वाव्हुळ यांनी या आदेशात दिल्या आहेत.त्याचप्रमाणे शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता धारण न करणाऱ्या शिक्षकांची सेवा संबंधित खाजगी संस्थांनी यापुढे सुरू ठेवल्यास त्या शिक्षकास १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतन दिले जाणार नाही, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुदानित आणि अंशत: अनुदानित अशा अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण न करता शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या शिक्षकांची सेवा समाप्त होणार आहे. सर्व संस्थांच्या अध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापकांच्या नावे हे आदेश काढण्यात आले आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणStudentविद्यार्थी