...तरच हमालांकडून होणार मालाची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:39 IST2017-11-24T23:38:54+5:302017-11-24T23:39:22+5:30
जो व्यापारी हमाल- माथाडी कायद्याची अंमलबजावणी करेल, त्यांचाच माल उचलला जाईल, असा निर्णय हमाल-माथाडी कामगारांनी शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर घेतला.

...तरच हमालांकडून होणार मालाची उचल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जो व्यापारी हमाल- माथाडी कायद्याची अंमलबजावणी करेल, त्यांचाच माल उचलला जाईल, असा निर्णय हमाल-माथाडी कामगारांनी शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर घेतला.
परभणी जिल्ह्यात माथाडी बोर्डाची स्थापना होऊन १३ वर्षे उलटले आहेत. अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने हमाल कामगार तीन दिवासांपासून संपावर गेले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव व व्यापारी आणि हमालांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या बैठकीत ठोस असा निर्णय झाला नाही. त्यानंतर सभागृहाबाहेर हमाल- माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणाºया व्यापाºयांचाच माल उचलला जाईल, असे ठरविण्यात आले. या बैठकीस सभापती समशेर वरपूडकर, सचिव विलास मस्के, संदीप भंडारी, रमेशराव देशमुख, विलास बाबर, किर्तीकुमार बुरांडे, राजन क्षीरसागर, शेख महेबुब, फैजुल्ला खान पठाण आदींची उपस्थिती होती.