दारूबाबतचा जाब विचारताच एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:00+5:302021-05-25T04:20:00+5:30

जोगवाडा येथील एकनाथ मनोहरराव वाळके यांच्या मुलाला व भाचा विश्वराज मेटकर यांना गावातील सुंदर ज्ञानोबा मस्के याने २० मे ...

One was beaten when asked about alcohol | दारूबाबतचा जाब विचारताच एकास मारहाण

दारूबाबतचा जाब विचारताच एकास मारहाण

जोगवाडा येथील एकनाथ मनोहरराव वाळके यांच्या मुलाला व भाचा विश्वराज मेटकर यांना गावातील सुंदर ज्ञानोबा मस्के याने २० मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास फोन करून दारू पिण्यास येण्यास सांगितले. याचा जाब एकनाथ वाळके यांनी मस्के यांना विचारताच त्यांनी वाळके यांना शिवीगाळ केली. तसेच जोगवाडा पाटी येथे बोलावून मारहाण केली. यावेळी त्यांचा लहान भाऊ भानुदास वाळके व इतरांनी येऊन सोडवासोडव केली. मार लागल्याने वाळके यांनी दोन दिवस आराम केल्यानंतर २२ मे रोजी चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी सुंदर ज्ञानोबा मस्के याच्या विरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्‍याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: One was beaten when asked about alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.