पाथरीत दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; सात वर्षाची नात सुदैवाने बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 18:00 IST2024-06-12T17:59:56+5:302024-06-12T18:00:27+5:30
पाथरी ते पोखरणी रस्त्यावर पोहेटाकळी शिवारात झाला अपघात

पाथरीत दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; सात वर्षाची नात सुदैवाने बचावली
पाथरी ( परभणी) : पाथरी ते पोखरणी रस्त्यावर पोहेटाकळी शिवारात आज दुपारी २. ३० वाजेच्या सुमारास अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सात वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे. हनुमान बाबुदेव जोशी असे मृताचे नाव आहे.
मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील हनुमान बाबुदेव जोशी ( ४७ ) हे दुचाकीवर ( एमएच २२ एझेड ०४३२ ) आज सकाळी मानवत येथील आपल्या बहिणीकडे गेले होते. बहिणीला भेटून ते दुपारीच २ वाजेच्या सुमारास मानवतहून केकरजवळा गावाकडे आपली नात श्रीनिधी गौरव शिराळे ( ७) सोबत निघाले. पाथरी ते पोखरणी रस्त्यावरून जात असताना २.३० वाजेच्या सुमारास पोहेटाकळी शिवारात दुचाकीचा अपघात झाला. यात हनुमान जोशी जागीच ठार झाले. तर त्यांची नात श्रीनिधी शिराळे बचावली. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.